राष्ट्रगीताची शतकपूर्ती

ज्यादिवशी अण्णांची भ्रष्टाचार विरोधी चळवळ ऐतिहासिक वळण घेत होती, त्याच दिवशी योगायोगाने आपलं राष्ट्रगीताने शतक गाठलं. ‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली.

Updated: Dec 28, 2011, 01:55 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

‘जन गण मन’या भारतीय राष्ट्रगीताला काल २७ डिसेंबर रोजी १०० वर्षं पूर्ण झाली. योगायोगाने 'जन गण मन'ची शतकपूर्ती अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी 'रण' पुकरण्यातून साजरी झाली.

 

राष्ट्रीय चळवळीला अधोरेखित करणारं रविंद्रनाथ टागोरांचं ‘जन गण मन’ हे गीत सर्वप्रथम २७ डिसेंबर १९११ रोजी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायले गेले होते. भारतीय घटनेने हेच गीत पुढे २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून संमत केलं गेलं.

 

प्रत्यक्षात, बंकिमचंद्र चटर्जी यांचं ‘वंदे मातरम्’ हे गीत राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात येणार होतं. परंतु, ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत म्हणून मान्य करण्यास मुस्लिमांनी विरोध केल्यामुळे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हणून संमस करण्यात आलं

 

जन गण मन हे संस्कृतप्रचुर बंगालीमध्ये रचना असलेलं आपलं राष्ट्रगीत २००५ मध्ये वादात सापडलं होतं. फाळणीनंतर पाकिस्तानाचा भाग बनलेल्या सिंधचा उल्लेख राष्ट्रगीतातून वगळण्याबद्दल आणि काश्मिरचा उल्लेख असावा यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र, ‘राष्ट्रगीत हे आपलं देशभक्तीपर स्तोत्र आहे. देशातल्या प्रांतांचा बखरनामा नाही.’ असा निर्वाळा देत सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.