www.24taas.com, मुंबई
नफा कमावण्यासाठी काही आंबा विक्रेत हे ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहेत...कॅल्शियम कार्बाईडचा वापर करुन अवघ्य़ा 8 - 10 तासात आंबा पिकविण्याचा उद्योग त्यांना चालवला आहे..नाशिक आणि सोलापूरमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय..
बाजारात आंबा विक्रीसाठी आला असल्यामुळे आता अन्न व औषध विभागाने मरगळ झटकली असून ठिकठिकाणी कारवाई सुरु केलीय... राज्यात आंब्याच्या आढींची पहाणी या पथकाकडून केली जात आहे.....त्यामागचं कारणही तेव्हडचं गंभीर आहे...काही आंबा व्यापारी आपल्या फायद्यासाठी ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहेत...आंब्याची लवकरात लवकर विक्री करुन नफा खिशात घालण्यासाठी काही आंबा विक्रेत्यांनी कृत्रिमरित्या आंबा पिकविण्याचा मार्ग शोधून काढलाय...आणि त्यासाठी वापरलं जातंय कॅल्शियम कार्बाईड हे अत्यंत घातक रसायन...अवघ्या काही तासात कच्च्या कैरीचं आंब्यात रुपांतर करण्याची ताकद या रसायनात आहे...पण अशा पद्धतीने पिकवला गेलेला आंबा खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम आंबा खाणा-याला भोगावे लागतात...त्यामुळेच कॅल्शियम कार्बाईडचा वापर करुन आंबा पिकवणा-यां व्यापा-यांविरोधात अन्न व औषध विभागाने कारवाई सुरु केलीय..
अन्न व औषध विभागाच्या पथकाने राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईतील एका आंब्याच्या आढीवर रविवारी छापा मारला..कारण या आढीतही आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात होता..
कै-यांमध्ये कॅल्शियम कार्बाईडची पावडर टाकण्यात आली होती...त्यामुळे आढीतील आंबा पिकायला सुरुवात झाली होती...हा आंबा जर ग्राहकांपर्यंत पोहचला असता तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली असती...त्यामुळे अन्न व औषध विभागाने हा सगळा आंबा तात्काळ कचरा डेपोकडं रवाना केला...
सोलापूर प्रमाणेत नुकतेच नाशिक मध्येही अन्न व औषध विभागाने आंब्याच्या आढीवर ठिकठिकाणी छापे मारले...
नाशिकमध्येही काही आंबा व्यापा-यांनी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करुन आंबा पिकविण्याचा उद्योग सुरु केला होता...पण अन्न व औषध विभागाला त्याची खबर लागल्यामुळे आंबा व्यापा-यांचा केमिकल लोचा उघड झाला..खरंतर नैसर्गिकरित्या आढीत आंबा पिकवून तो विकणं आपेक्षीत आहे...पण त्याला वेळ लागतो..
आंबा पाडाला लागल्यानंतरच झाडावरचा आंबा तोडला जातो..त्यामुळे तो नैसर्गिकरित्या पिकाण्यास जास्त वेळ लागत नाही...पण आता या पारंपारीक पद्धतीला फाटा दिला जात आहे.. आंब्याची मागणी वाढल्यामुळे पाडला लागण्यापूर्वीच आंबा तोडला जातो...त्या तोडलेल्या कच्च्या कै-या पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड सारखा घातक रसायनांचा वापर केला जातो...आंब्याच्या पेट्यांमध्ये कॅल्शियम कार्बाईडच्या बारीक बारीक पुड्या ठेवल्या जातात...आणि काही तासात पेटीतील कच्च्या कैरीला पिवळाधम्मक रंग येतो...पण हा आंबा दिसायला मोहक असला तरी आतून मात्र तो विषारी आहे
पिवळाधम्मक आंबा, त्याचा सुटलेला घमघमाट त्यामुळे आंबा खरेदी करण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही...पण तुम्ही पैसे देऊन आजार तर खरेदी करत नाही ना ? याची खातर जमा करा...कारण कॅल्शियम कार्बाईडचा वापर करुन पिकवेला आंबा तुम्हाला गंभीर आजार देवू शकतो...
स्फोटकं तसेच लोह वितळविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो. पण गेल्या काही वर्षात चक्क आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा सर्रास वापर केला जाऊ लागला आहे....लोह वितळविण्याची क्षमता असलेल्या या रसायनिक पदार्थात प्रचंड प्रमाणात उष्णाता निर्माण करण्याची क्षमता असते..आणि त्यामुळेच अवघ्या काही तासातचं आंबा पिकतो.. ही पिकण्याची प्रक्रिया आंब्याच्या आतून सुरु होण्याऐवजी बाहेरुन सुरु होते..या उलट नैसर्गिकरित्या आंबा सुरुवातील