शर्यत राष्ट्रपतीपदाची

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरुवात झालीय.. नुकतेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस घायाळ झाली असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रपती निवडकणुकीच्या पीचवर गुगली टाकला

Updated: Apr 24, 2012, 12:00 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरुवात झालीय.. नुकतेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस घायाळ झाली असतांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रपती निवडकणुकीच्या पीचवर गुगली टाकलाय...त्यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणुक काँग्रेससाठी सध्यातरी तेव्हढी सोपी राहिली नाही....

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उरलाय... त्यामुळे पक्षीय राजकारणालाही वेग आलाय.. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असलेली संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए आणि भाजपच्या नेतृत्वाखाली एकवटलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए या दोन्ही आघाड्यांमध्ये चांगलीच चुरस होणार आहे... अलिकडचं झालेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांचे निकाल त्याल कारणीभूत आहेत...उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये काँग्रेसला पराभवाचं तोंड पहावं लागलंय..त्यामुळे देशातली राजकीय परिस्थितीला वेगळं वळण लागलं...एकाएकी मध्यावधी निवडणुका किंवा तिस-या आघाडीचं सरकार अशी चर्चाही सुरु झाली...अशातच राष्ट्रपतीपदाची निवडणूक जुलै महिन्यात होवू घातलीय..नेमकी संधी साधून उत्तर प्रदेशात एकहाती सत्ताकाबीज करणा-या आणि संसदेत 22 खासदार असणा-या समाजवादी पक्षाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच नाव पुन्हा राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आणलं..समाजवादी पक्षाच्या या खेळीला सहाजिक मुस्लीम मतांची किनार आहे...कलामांच्या नावाला काही छोट्या-मोठ्या पक्षांकडूनही पाठिंबा मिळातोय..अशातच युपीएमधील एक महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतली आपली भूमीका जाहिर केली..आगामी राष्ट्रपती हा बिगर राजकीय असावा अशी गुगली खद्द शरद पवारांनीच टाकल्यामुळे काँग्रेससमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत

 

तसेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुक रणनितीत काँग्रेसने राष्ट्रवादीला विश्वासात घ्यावं हे सांगायलाही पवार विसरले नाहीत. यंदाची राष्ट्रपतीपदाची निवडणुक युपीएसाठी सोपी नाही...त्यांना काही मतांची जुळवाजुळव करण्याबरोबरच आपल्या घटक पक्षांची मतं इतत्र जाणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच ही निवडणुक देशाच्या इतिहासात महत्वाची ठरणार आहे...

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीए आणि एनडीएत चांगलीच चुरस होणार आहे...या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे...कारण राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराच्या नावावर युपीएतील घटक पक्षात एकमत होईल का हाच खरा प्रश्न आहे .राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीए आणि एनडीए सोबतच इतर पक्षांचं पक्षीय बलाबल महत्वाचं ठरणार आहे

राष्ट्रपतीपदाची आगामी निवडणुक युपीएसाठी जेव्हडी अवघड आहे तेव्हडीच एनडीएसाठीही कठीण होऊन बसलीय..कारण दोघांकडेही बहुमताचा अभाव आहे...युपीएच्या मतांवर नजर टाकल्यास  कॉँग्रेसकडं 1177 आमदार आणि 277 खासदारांच बळ आहे...त्यांच्या मतांच मुल्य 330485 इतकं आहे..युपीएचा घटकपक्ष तृणमूल काँग्रेसकडं 199 आमदार आणि 28 खासदार आहे त्यांच्या मतांचं एकूण मुल्य़ 48,049 इतकं आहे. द्रमुककडे 25 आमदार तर 25 खासदार आहेत त्यांच्या मतांचं मुल्य 21780 इतकं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडं 94 आमदार आणि 16 खासदार आहेत राष्ट्रवादीच्या मतांच मुल्य 23850 इतकं आहे..राजदकडं 27 आमदार आणि 6 खासदार आहेत त्यांच्या मतांचं मुल्य 8934 इतकं आहे...नॅशनल कॉन्फरन्सचे 28 आमदार आणि 5 खासदार आहेत त्यांच्या मतांच मुल्य 5556 इतकं आहे..मुस्लीम लीगकडे 20 आमदार आणि 2 खासदार आहेत त्यांच्या मतांचं एकूण मुल्य 4456 इतकं आहे.जेव्हीएमकडं 11 आमदार आणि 2 खासदार इतकं संख्याबळ आहे ..त्यांच्या मतांचं मुल्य 3352 इतकं आहे...एआयएमआयएमकडं 7 आमदार आणि 1 खासदार आहे त्यांच्या मतांच मुल्य 1744 इतकं आहे...बीपीएफचे 12 आमदार आणि 2 खासदार आहेत ..त्यांच्या मतांच मुल्य 2808 इतकं आहे...युपीएचा घटकपक्ष केर