www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावातले पाणी हिरवे झाल्यानं आजूबाजूला दुर्गंधी पसरलीय. रंकाळ्याची ही परिस्थीती बदलण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं दोन बोटीच्या माध्यमातून उपायोजना सुरु केल्यात. पण या बोटीवर काम करणा-या सात कर्मचा-य़ाना मात्र जीव मुठीत धरुन काम करावं लागतंय.
कोल्हापुरकरांचा मानबिंदू असलेल्या रंकाळा तलावाची दारुण अवस्था झालीय. महापालिकेचे दुर्लक्ष हेच रंकाळ्याच्या या अवस्थेचं मुख्य कारण आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारावी यासाठी महापालिकेनं प्रयत्न सुरु केलेत. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेमध्ये मिळालेल्या या बोटीवर सात कर्मचारी काम करतायत. रंकाळ्याचं पाणी ढवळल्यामुळं पाण्यामध्ये ऑक्सीजन चांगला मिसळला जाईल आणि कुजलेलं शेवाळ कमी होईल म्हणुन कर्मचा-यांना अशा प्रकारे कसरत करावी लागतेय. पण या कर्मचा-याकडे लाईफ जॅकेट, दोर आणि डिझेल संपल्यावर कडेला येण्यासाठी वल्लेही नाहीत. त्यामुळे त्यांना अक्षरश: जीव मुठीत धरुन काम करावं लागतंय. महापालिकेच्या या बेजावबदार कारभारावर पर्यावरण प्रेमीतुन संताप व्यक्त होतोय.
रंकाळ्यातून अशा बोटी फिरवल्यानं शेवाळं तरी कमी होतंय. पण हे करत असताना अपघात झाल्यास कर्मचा-यांच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे डोळे एखादा अपघात झाल्यानंतरच उघडणार का अशा प्रश्न विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.