बनावट नोटांचं मायाजाल!

बनावट नोटांपासून सावधान ! तुमच्या खिशात बनावट नोट तर नाही ना ? 10 ,20 ,50 रुपयांची नोटही असू शकते नकली ! कशी ओळखाल बनावट नोट ?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 14, 2013, 11:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुमच्या खिशात ... तुमच्या पर्समध्ये .. तुमच्या कपाटात ... तुमच्या तिजोरीत ...ठेवलेल्या नोटा बनावट असू शकतात..तुम्हाला दुकानदाराने दिलेली नोट,एटीएममधून काढलेला नोटा बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही..कारण आता तुम्ही जे काही पहाणार आहात ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे....
पाचशे आणि हजाराच्या नोटाचं बनावट असतात असा जर तुमचा समज असेल तो तुमचा गैरसमज आहे..कारण आता कमी किंमतीच्या नोटाही बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
दहापासून ते हजारपर्यंतच्या नोटा बनावट असण्याची शक्यता खुद्द रिझर्व बँकेनेच व्यक्त केलीय..दिल्ली ही बनावट नोटांची राजधानी असल्याचं खुद्द रिझर्व बँकेने मान्य केलं असून रिझर्व बँकेने झी मीडियाला ही माहिती दिलीय..
मुंबईपासून दिल्लीपर्यंत बनावट नोटांचा जप्त केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण आता खुद्द रिझर्व बँकेनं बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचं माहितीच्या अधिकारात कबुल केलंय..धक्कादायक बाब म्हणजे देशाची राजधानी दिल्ली हे बनावट नोटांच केंद्र बनलंय...
तुमच्या खिशात असलेल्या नोटांपैकी काही नोटा अशाही असतील ज्याला कवडीचीहि किंमत नाही..पण त्याची तुम्हाला जराही कल्पना नाही...होय देशात बनावट नोटा चलनात आणणारं रॅकेट कार्यरत असून त्यामुळे तुमच्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न त्यातून केला जात आहे.
आज पर्यंत केवळ शंभर, पाचशे आणि हजार रुपयांच्या ूबनावट नोटा तयार केल्या जात असल्याचं बोललं जात होतं...पण आता कमी रक्कमेच्या नोटांवरही बनावटा तयार करणा-यांनी लक्ष्य केंद्रीत केलय..
झी मीडियाने देशातील बनावट नोटांविशयी रिझर्व बँकेकडं माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती..त्यावर रिझर्व बँकेनं जी माहिती दिलीय ती धक्कादायक आहे.. कमी रक्कमेच्या बनावट नोटा आढळून आल्याचं ऱिझर्व बँकेनं सांगितलंय..यावरुन देशात केवळ हजार आणि पाचशेच्याच नाही तर 100, 50, आणि 20 रुपयाच्या नोटा बनावट असण्याची शक्यता नकारता येत नाही..खरं तर या विषयी सामान्य जनतेला कोणतीच कल्पना नाही...
रिझर्व बँकेनं झी मीडियाला माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती दिलीय त्यानुसार दिल्लीत गेल्या तीन वर्षात दिल्लीत

10 रुपयांच्या
503 नोटा
--------
20 रुपयांच्या
587 नोटा
--------
50 रुपयांच्या
16532 नोटा
---------
100 रुपयांच्या
444845 नोटा
------
500 रुपयांच्या
896422 नोटा
--------
1000 रुपयांच्या
220106 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत..हा अकडा केवळ जप्त केलेल्या बनावट नोटांचा आहे..मात्र ज्या नोटा ओळखता आल्या नाहीत अशा नोटांचा अकडा मोठा असण्याची नाकारता येत नाही..तेव्हा आता कमी रक्कमेच्या नोटाही स्विकारतांना त्या निट पाहून घ्या..
झी मीडियाला माहितीच्या अधिकारात रिझर्व बँकेनं जी माहिती दिलीय त्यामध्ये दिल्ली ही बनावट नोटांची राजधानी बनल्याचं मान्य केलं...देशात सर्वाधिक बनावट नोटा या एकट्या दिल्लीत जप्त करण्यात आल्या आहेत.. हा बनावट नोटांचा नवा फॉर्म्यूला असून हा एका अंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे..दिल्ली हे देशात बनावट नोटांचं केंद्र बनलं आहे..झी मीडियाने माहितीच्या अधिकारात रिझर्व बँकेकडून जी माहिती मिळवलीय त्यामध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
गेल्या तीन वर्षांत देशातील विविध शहरात बनावट नोटां जप्त करण्यात आल्या असून ... दिल्ली 2,19,306 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कोलकातामध्ये 66,831 नोटा जप्त करण्यात आल्या तर मायानगरी मुंबईत 89,757 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. कानपुरमध्ये 1,61,108 नोटा, चंदीगडमध्ये 1,09,647 नोटा तर चेन्नईमध्ये बनावट नोटा 1,10 ,649 नोटा ज़प्त करण्यात आल्या...बनावट नोटा तयार करणा-य़ांनी नवा फॉर्म्यूला शोधला असला तरी भारतात नोटा आणण्य़ासाठी ते पूर्वीचा मार्गाचा अवलंब करत आहेत... पाकिस्तानातून बनावट नोटा भारतात चोरीछुपे आणल्या जातात आणि नंतर त्या शहरात पाठवल्या जातात...
देशात जवळपास 2 लाख कोटी रुपयांच्या बनावट नोटा असल्याचा अंदाज आहे. देशातील 3 टक्के नोटा बनावट असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.....याचाच अर्थ 100 पैकी तीघाजणांच्या खिशात बनावट नोटा पोहचल्या आहे.. आणि कमी रक्कमेच्या बनावट नोटा चलनात आणून प्रत्येकाच्या खिशात बनावट नोटा पोहचवण्याचा प्रयत्न केला जात तर नाही ना? अ