फिल्म रिव्ह्यू - सिक्सटीन

सध्या १६, १८ या मुलींच्या वयावरून सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना राज पुरोहित यांचा सिक्सटीन हा सिनेमा १२ जुलैला प्रदर्शित झाला.

Updated: Jul 14, 2013, 07:22 AM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
सध्या १६, १८ या मुलींच्या वयावरून सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना राज पुरोहित यांचा सिक्सटीन हा सिनेमा १२ जुलैला प्रदर्शित झाला. एक प्रकारे तरुण पिढी, त्यांचे विचार, त्यांना घर आणि घराबाहेर कराव्या लागणाऱ्या संकटांचा सामना या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे सिक्सटीन होय. सध्याच्या झपाट्याने बदलत चाललेल्या युगात तरुण पिढी कसा विचार करते, बदलत चाललेली लाईफ याचे चित्रीकरण या चित्रपटात केले गेले आहे.
चित्रपटाचे कथानक
उच्चभ्रू वर्गातील सोळा वर्षाची चार मुले. दिल्लीच्या मोठ्या पब्लिक स्कूलमध्ये जाणारे अनू (इझाबेल लिट्टे), निधी (महक मनवानी), तनिशा (वामिका गब्बी), अश्विन (हाय‌तफिल मॅथ्यू) हे या चित्रपटातील महत्वाचे कलाकार आहेत. श्रीमंत आणि भरपूर पैसा असल्यामुळे या हाय क्लास जीवन जगणारी ही मुले आहेत. चारही जण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. निधीला रोहन आवडत असतो, तनीशाला एखादा जोडीदार हवाय तर रोहनला तनीशा आव़डते. आणि अनू बिनधास्त मुलगी असली तरी एकटी आहे. पबमध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत नाचणारे आपले वडील पाहून तनीशा मनाने पूर्णपणे खचून जाते. यापेक्षा मोठा बिकट प्रसंग ओढावतो अश्विन याच्यावर. नैराश्यतून अश्विनच्या हातून त्याच्या वडिलांचा खून होतो. दुसऱ्या बाजूला निधी गरोदर राहते. आणि अनूचा एक अश्लील एमएमएस सगळ्यांसमोर येतो. अचानकपणे आलेल्या या संकटांना तोंड देताना चारही जण अक्षरक्ष: कोसळून जातात. परंतु या सर्वात त्यांना त्याच्या कुटुंबाची साथ मिळते आणि चौघेही सावरतात.
दिग्दर्शन
सोळाव्या वर्षांतील मुलांची मानसिकता मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. मात्र हा प्रयत्न सर्वसमावेशक दिसून येत नाही कारण या चित्रपटात संपूर्णपणे उच्चभ्रू वर्ग दिग्दर्शकाने दाखवलाय. काही ठिकाणी अतिशयोक्ती दिसून येते. एकूणच सहसा न पचणारं सत्य मांडण्यावर दिग्दर्शकाचा भर आहे. मध्यांतरापर्यंत चित्रपट छान वाटतो त्यानंतर मात्र तो थोडा भऱकटतो.
अभिनय
यातील सगळे कलाकार हे नवखे आहेत. यातील अश्विनची भूमिका हाय‌ळफिल मॅथ्यू याने फारच सुंदर केलेली आहे. अनू (इझाबेल लिट्टे), निधी (महक मनवानी), तनिशा (वामिका गब्बी) यांनीही चांगला अभिनय केलाय.

चित्रपट का पहावा
पुन्हा पाहावा असा हा काही चित्रपट नाही परंतु एकदा पाहण्यास काहीच हरकत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.