भारतात पहिल्यांदाच... ‘शोन कॉम्प्लेक्स’वर दुर्मिळ हार्ट सर्जरी!

मुंबईतल्या जसलोक हॉस्पीटलमध्ये अवघ्या चार वर्षांच्या नायजेरियन मुलावर दुर्मिळ अशी हार्ट सर्जरी पार पडलीय. यामुळं शोन कॉम्प्लेक्स या जीवघेण्या हदयरोगापासून त्याला मुक्ती मिळालीय. भारतात पहिल्यांदाच ही हार्ट सर्जरी पार पडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2013, 11:11 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या जसलोक हॉस्पीटलमध्ये अवघ्या चार वर्षांच्या नायजेरियन मुलावर दुर्मिळ अशी हार्ट सर्जरी पार पडलीय. यामुळं शोन कॉम्प्लेक्स या जीवघेण्या हदयरोगापासून त्याला मुक्ती मिळालीय. भारतात पहिल्यांदाच ही हार्ट सर्जरी पार पडलीय.
अवघ्या चार वर्षांच्या या ‘विल्सन’च्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच हास्य दिसलं ते त्याला भारतीय वैद्यकशास्त्रानं दिलेल्या जीवदानामुळं... मूळचा नायजेरियाचा नागरिक असलेल्या ‘विल्सन’ला श्वास घेताना त्रास होत होता. त्यामुळं त्याला सामान्य मुलांसारखं खेळता येत नसे तसंच त्याची वाढही खुंटली होती.
उपचारासाठी मुंबईतल्या जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला ‘शोन कॉम्प्लेक्स’ नावाचा खूप दूर्मिळ आणि गुंतागुंतीचा असा जीवघेणा हदयरोग झाल्याचं समोर आलं. आतापर्यंत वैद्यकशास्त्राच्या इतिहासात जगभरात केवळ शंभरहून कमी केसेस अशा सापडल्या आहेत. हदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश जोशी यांनी क्लोज्ड आणि ओपन हार्ट सर्जरी करुन त्याला जीवदान दिलंय. भारतात अशा प्रकारची प्रथमच सर्जरी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
‘शोन कॉम्प्लेक्स’ची कारणं
‘शोन कॉम्प्लेक्स’ हा दुर्मिळ हदयरोग असला तरी तो होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत. आईला मधुमेह असल्यास हा आजार होवू शकतो. गरोदर असताना पहिल्या तीन महिन्यांत व्हायरल इन्फेक्शन झाल्यास, गरोदरपणी पुरेसा आहार न मिळाल्यास तसंच यादरम्यान अतिदूषित पाणी पिल्यास होणाऱ्या मुलाला हा रोग होण्याची शक्यता असते. तसंच गरोदर असताना आईने मद्यपान, स्मोकिंग केल्याची सजा होणाऱ्या मुलास भोगावी लागते.

भारतात दरवर्षी सुमारे तीन लाख लहान मुलांना हदयाशी संबंधित रोग होतात. त्यामुळं हदयरोगाचे प्रमाण केवळ मोठ्यांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही अधिक असल्याचं समोर आलंय. यासाठी पालकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.