www.24taas.com, मुंबई
भारतीय चित्रपट म्हणजे जणू आपलं जीवनच, आपला श्वास म्हणजे चित्रपट... दादासाहेब फाळके या मराठी माणसानं 1913 साली राजा हरिश्चंद्र चित्रपटाव्दारे रुपेरी पडदा उजळवून टाकला... या प्रवासाला शंभर वर्ष होताहेत...आणि या शंभर वर्षात चित्रपट म्हणजे फाळकेंच नाही तर प्रत्येक सर्वसामान्यांच स्वप्न झालं.. आणि समोर दिसणारा रुपेरी पडदा म्हणजे आपलं आयुष्य बनलं..
अध्यात्म म्हणजे आपल्या भारतीय जीवनाचा पाया.. आपल्या नसानसांमध्ये वाहणारा धर्म म्हणजे आपल्या समाजाचा प्राणवायू..त्यामुळं राजा हरिश्चंद्रच्या रुपानं 1913 साली रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा अवतरल्या त्या आपल्या देव देवता आणि संस्कृती..आपली मूल्य.. जीवननिष्टा.. सगळं सगळं काही चित्रपटांव्दारे दिसायला लागलं.. हजारो वर्षांची आपली परंपरा अनेक परकीय आक्रमणांमधून आपण जीवंत ठेवली आणि सुरवातीच्या काळातल्या चित्रपटांव्दारे ती पडद्यावर आली. सुरवातीला मूक असलेला चित्रपट पुढे बोलू चालू लागला... आलमआराच्या रुपानं....१९३१मध्ये आलम आरा रुपेरी पडद्यावर झळकला... त्यानंतर पुढे चित्रपट गाऊ लागला आणि चित्रपट म्हणजे जणू आपल्या मर्मबंधातली ठेव बनली... सुरवातीला कृष्मधवल असलेला चित्रपट मग रंगीत बनला आणि भावभावनाचं इंद्रधनुष्यच आपल्यासमोर खुलं झाल..
आपला समाज जसा बदलत गेला तस तसा आपले चित्रपटही बदलत गेले... समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात उमटत गेलं तसचं समाजाला दिशा देण्याचं कामही चित्रपटांनी केलं... चित्रपटांनी आपल्याला काय शिकवलं नाही ? आईची माया...भावाबहिणीचं प्रेम... आयुष्यात येणा-या संकटांवर मात करण्याची जिद्द... असत्यावर सत्यानं.. वाईपणावर चांगूलपणानं केलेली मात.. मानवी आयुष्याचं भावभावनाचं इंद्रधनुष्य... आपल्या आयुष्यातला चांगल्या आणि वाईट प्रवृती चित्रपटांमध्ये दिसल्या... अन्यायाविरुद्ध लढणा-याला अखेर न्याय मिळतो हा विश्वास जागा ठेवला तो आपल्या चित्रपटांनी.. चित्रपट संपायच्या आत खलनायकाचा अंत होत न्यायासाठी लढणारा विजयी होणारा नायक म्हणजे जणू आपणच होतो... चित्रपटांनी आपल्या जीवनातले हळवे क्षण टिपले...आशा निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावणारे आपले आयुष्य रुपेरी पडद्यावर साकारतांना आपण रंगून गेलो. प्रेम करायला शिकवलं ते चित्रपटांनी...आयुष्यातल्या आनंदी क्षणी आपल्या ओठांवर चित्रपटांमधली गाणी येतात... . पुरती शंभर वर्ष... चित्रपटांनी आपल्या समाजातला चांगलूपणा जपला... स्त्री शक्तीची जाणिव करुन दिली.. स्त्रीयांचा सन्मान करायला शिकवला.. आपल्या परंपरेनं दिलेला स्त्री म्हणजे देवी हा संस्कार आधुनिक काळात जिवंत ठेवला तो आपल्या चित्रपटांनी.... जातीव्यवस्थेच्या पलीकडे जात मानवतेवर प्रेम करायला शिकवलं ते रुपेरी पडद्यानचं.. काळ बदलला समाज बदलला पण चित्रपट म्हणजे आपलं जीवनं हे समीकरण कायम राहिलं...3 मे 1913 ते 3 मे 2013 पर्यंत... तब्बल शंभर वर्ष...
राजा हरिश्चंद्रने भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली..आणि बघता बघता सिनेमाने सिनेरसिकांच्या जीवनाचा भाग बनला.. ब्लॅक व्हाईटच्या जमान्यातल्या त्या सुपरस्टार कलावंतानी प्रेक्षकांना स्वप्न वाटली ती मात्र रंगीत आणि मखमली.. त्या काळी सिनेमाची गाणी , संवाद सिनेरसिकांच्या ओठी रुळले आणि आजही त्या ओळी आपण गुणगुणतोय तो वैभवशाली वारसा जपत...
आलम आरा प्रदर्शित झाला आणि मुका असलेल्या भारतीय सिनेमाला वाचा आली..सिनेमातील संवाद हे सिनेरसिकांच्या ओठी रुळण्यास सुरुवात झाली आणि आजही तो सिलसिला कायम आहे...प्रेक्षकांना भावना-या संवादावर थियटरमध्ये हमखास शिट्या आणि टाळ्या पडणार ...
पुढच्या काळात काही अभिनेत्यासाठी खास संवाद लिहिले जाऊ लागले... चाळीस ते साठ ही दोन दशकं म्हणजे भारतीय सिनेमाचा सुवर्ण युगच म्हणावा लागेल...तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा होता...देशप्रेमाबरोबरच सिनेमातून प्रेमकथाही पडद्यावर साकारल्या गेल्या..१९४८मध्ये आर.के बॅनरची स्थापना झाली...आवारा, श्री४२० मधून कष्टकरी समाजाचं प्रतिबिंब रुपेरी पडद्यावर उमटलं...राजकपूर आणि नर्गिंस या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली...
१९५७ साली गुरु दत्त यांचा प्यासा आला.... गुरु दत्त यांनी प्यासामधून शहरी जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता..याच काळात हिंदी सिनेमातील काही कलाकृतींची निर्मिती झाली... मेहबुब खान यांचा मदर इंडिया याच वर्षी रुपेरी पडद्यावर झळकला. या सिनेमाने भारतीय सिनेरसिकांच्या मनावरमोहिनी घातली होती..त्यावर्षी सर्वाधिक चाललेल्या सिनेमांपैकी मदर इंडिया हा एक होता. १९५३साली बिमल रॉय यांचा अशयपूर्ण दो बिघा जमिन आला. साठच्