www.24taas.com, यवतमाळ
यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर तंबाखुची पाने खाणा-या अळीने हल्ला केलाय. तंबाखुची पाने खाणा-या अळ्या म्हणजेच लष्करी अळ्यांचा हा प्रादुर्भाव आहे.अळ्यांच्या आक्रमनामुळे पानांच्या जाळ्या होऊ लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात आलंय.
सोयाबीनची ही अवस्था लष्करी अळ्यांनी केल्यामुळे पानांची अक्षरक्षा जाळी झालीय. २००८ साली सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला झाला आणि दिड हजार कोटी रुपय़ांचा नुकसान झालंय़. यावेळीही वेळीच उपाय योजना हाती घेतली नाही तर शेतक-यांचं नुकसान अटळ आहे. कारण यंदाही आर्थिक नुकसानीची पातळी लष्करी अळ्यांनी गाठली आहे. १० अळ्या प्रतीमिटर यानुसार हे नुकसान ठरतं. यावर्षी उशिरा पेरणी पावसाची उघडझाप आणि ढगाळ वातावरणामुळे प्रादुर्भाव वाढलाय. एक मादी सर्वसाधारणपणे दोन हजारहून अधिक अंडी घालते. ३ ते ४ दिवसांमध्ये अंड्यातून आलेली अळी २२ दिवसांपर्यंत सोयाबीनवरील पाने फस्त करुन कोषाअवस्थेत जाते.त्यानंतर पतंग बाहेर पडतो. अशा पद्धतीने साधारण ३५ ते ४० दिवसात त्याची वाढ पूर्ण होते. सदर अळीचं नुकसान करण्याची क्षमता ७५ टक्के पर्यंत होउ शकतं त्यामुळे या किडींवर वेळीच उपाय करण आवश्यक आहे.
लष्करी अळ्यांचं नियोजन करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने नियोजन करण आवश्यक आहे. झाडावरील अंडीपूंजांचं निरिक्षण करुन त्यांना नष्ट कराव तसेच प्रकाशसापळे आणि पक्षी थांब्यांच्या मदतीनेही हि कीड मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणता य़ेते.प्रादुर्भाव वाढला असेल तर रासायनिक किटकनाशकांच्या फवारण्या घेणं आवश्यक ठरतं. त्यामुळे आलटून पालटून वेगवेगळ्या किटकनाशकांच्या फवारण्या शेतक-यांनी घ्याव्यात.
फक्त रासाय़निक पद्धतीने शेतकरी किडीचं नियंत्रण करतो. अशा पद्धतीने मात्र मित्र किडींचा मोठ्या प्रमाणात -हास होत असल्याने शेतक-यांनी एकात्मिक पद्धतीने किडींचं नियंत्रण करावं.