www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आजपर्यंतची जगातील सर्वात वेगवान ट्रेन तयार करण्याचं शिवधनुष्य जपानने पेललंय...त्या ट्रेनला नजरेत कैद करणं तसं कठीण आहे कारण एका क्षणात ती तुमच्या नजरेआड होते..वेगाचा थरार काय असतो ते जपानच्या त्या वेगावान ट्रेनला बघीतल्यानंतर पहायला मिळतं...
डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच ती तुमच्या समोरुन निघून जाईलही..तिला नजरेत कैद करणं कठीण आहे...कारण ती आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन...अत्यंत वेगवान ट्रेन तयार करण्याचं शिवधनुष्य पेललंय उगवत्या सूर्याचा देश जपानने....ही ट्रेन ताशी 500 किलोमीटरच्या वेगाने धावणार आहे....होय, विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे...आपल्या अनोख्या आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानासाठी जगभरात विख्यात असलेल्या छोट्याश्या जपाननं पुन्हा एकदा गरुड झेप घेतलीय. L O सीरिजची नवी मॅगवेल अर्थात मॅगनेटिक लेव्हिटेशन या बुलेट ट्रेनची जपानच्या यामानाशी येथे यशस्वीपणे चाचणी घेण्यात आलीय. जपानची राजधानी अर्थात टोक्यो ते नागोया या दोन शहरांदरम्यान ही तुफान ट्रेन धावणार असून ती ताशी 500 किलोमीटरच्या वेगाने या दोन शहरांमधील अंतर केवळ 40 मिनीटांत पार करणार आहे. चाचणी दरम्यान या बुलेट ट्रेनला पाच डब्बे जोडले होते, मात्र तिला 16 डबे असणार आहेत....त्य़ामधून एका वेळी एक हजार प्रवासी या ट्रेनने प्रवास करु शकतील... वा-यापेक्षाही जास्त वेगाने धावणा-या या बुलेट ट्रेनचं पहिली झलक सोमवारी यामानाशी येथे पहायला मिळाली .. सर्व सोईसुविधांनी सज्ज अशी ही बुलेट ट्रेन जगभरातील इंजिनिअर्सला आव्हान देणारी अशीच आहे. 1964साली जपानमध्ये बुलेट ट्रेनचा जन्म झाला.. शिनकानसन असं नाव असलेल्या या पहिल्या बुलेट ट्रेन नंतरही जपाननं बुलेट ट्रेनच्या वेगाचे नवनवीन विक्रम नोंदवले.. आता ताशी 500 किलोमीटर्सच्या वेगाने धावणा-या या फास्टेस्ट ट्रेनची सफर अनुभवण्यासाठी सर्वच उत्सुक असून २०२७मध्ये ही ट्रेन प्रत्येक्षात धावणार आहे. जगभरात बुलेट ट्रेनच्या वेगाचे नवनवे रेकॉर्ड नोंदवले जात असतांना भारताती ट्रेनचा वेग मात्र अजूनही ताशी शंभर किलोमीटरच्या आतच आहे..
भारतात हायस्पीड ट्रेन चालविण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे.. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असतांना ही माहिती त्यांनी दिली होती.. वेगवान ट्रेनच्या निर्मितीत चीनही मागे नाही.. ताशी ४२० किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन चीनने तयार केलीय..
ताशी ५०० किमीचा वेग असलेल्या बुलेट ट्रेनची निर्मिती जपानमध्ये केली जातेय...पण भारतात अशा प्रकारची बुलेट ट्रेन कधी धावणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... आपण मात्र त्याचा अजून विचारच करत आहोत....पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्पाला नुकताच ग्रीन सिग्नल दिलाय..पण भारतात खरंच बुलेट ट्रेन धावणार का हाच खरा प्रश्न आहे..
जगातील वेगवान ट्रेन तयार करण्यासाठी फ्रान्स, स्पेन, जर्मनी यांच्यात स्पर्धा आहे..पण खरंतर वेगवान ट्रेन तयार करण्याचं श्रेय जाते ते जपानला.. बुलेट ट्रेनची देणगी जपानने दिली आहे..जपानमध्ये विविध वेग मर्यादा असलेल्या ट्रेन आहेत.. बुलेट ट्रेनच्या क्षेत्रात जपान आघाडीवर आहे..जपानमध्ये विविध वेगमर्यादा असलेल्या ट्रेन चालवल्या जातात.
जपान,चीन, जर्मनी आणि अमेरिका या देशात सर्वात वेगवान ट्रेनची निर्मिती करण्याची जणू स्पर्धा लागली आहे...ताशी पाचशे किलोमीटर वेग असणा-या ट्रेनची निर्मिती जपानकडून केली जात असून २०२७मध्ये ही ट्रेन प्रत्येक्षात धावणार आहे..जगाच्या तुलनेत भारत विचार केल्यास भारतात धावणा-या ट्रेनचा वेग फारच नगन्य आहे...पण अलिकडच्या काळात भारतात बुलेट ट्रेनच्या निर्मितीवर विचार केला जात आहे...पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकतेच तसे संकेत दिले होते..
सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळं काही सुरळीत झाल्यास देशाची आर्थिक राजधानी मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या अडीच तासाच पार करता येईल. तसेच अडीच तासात मुंबई ते दिल्ली हे अंतरही पार करता येईल..
मुंबई ते अहमदाबाद हे अंतर ५०० किलोमीटर असून दुरांतो एक्स्प्रेसने हे अंतर पार करण्यासाठी सात तासाचा अवधी लागतो..पण जर या मार्गावर बुलेट ट्रेन धावल्यास मुंबईहून निघालेली ट्रेन केवळ अ़डीच तासात अहमदाबादला पोहोचेल..
या संभावीत बुलेट ट्रेनचा सुरुवातीचा वेग ग्रफिक्स इन - ताशी २०० किमी ठेवण्यात येणार असून पुढे तो ३५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे ग्राफिक्स आऊठ-मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्यासाठी अंदाजे साठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे..बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला पंतप्रधानांनी