तुरीच्या पीकावर संकट

अनियमित पावसामुळे यंदा तुरीवर संकट ओढवलंय. त्यामुळे तुरीच कमी प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही उपाय योजना हाती घेतल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2012, 04:43 PM IST

www.24taas.com, परभणी
अनियमित पावसामुळे यंदा तुरीवर संकट ओढवलंय.त्यामुळे तुरीच कमी प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही उपाय योजना हाती घेतल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.
गेल्या काही दिवासांपासून राज्यभरात पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी मात्र पावसाची अजूनही ही प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस नसल्याने तुरीचं पीक सध्या अत्यंत नाजूक अवस्थेत आहे.
त्यामुळे सध्या जमिनीत आहे तो ओलावा टिकवणं आवश्यक आहे. त्यासाठी कोरडवाहू संशोधन केंद्राने सुचविल्यानुसार तुरीच्या शेतात बळीराम नागराच्या सहाय्याने चार ते सहा ओळीनंतर हलक्या सऱ्या शेतकऱ्यांनी घ्याव्यात.यामुळे पाणी जिरण्यास मदत तर होईल तसेच वाफसा टिकून राहण्यासही मदत होईल.
तुरीवर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी यामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकांमध्ये वाढेल. तसेच झाडांची संख्या जास्त असेल तर वेळीच विरळणी करावी आणि झाडांमधील स्पर्धा थांबावावी.
वातारवणातील प्रतीकूल अवस्था विचारात घेतली तर शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पादनासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रतिकुल परिस्थीतीत चांगलं उत्पदान मिळण्यास मदत होणार आहे.