www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये नद्यांची अक्षरशः गटारगंगा झाल्याचं वृत्त झी 24 तासनं दाखवलं होतं. त्यानंतर महापालिकेला जाग आलीय आणि अखेर नद्यांमधली जलपर्णी काढण्याचं महापालिकेला सुचलं आहे.
पिंपरी-चिंचवडमधल्या पवना, इंद्रायणी, मुळा, मुठा या नद्यांमध्ये जलपर्णी प्रचंड प्रमाणात वाढली होती. परिणामी शहरात डास वाढले आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. झी 24 तासनं हे वृत्त दाखवलं होतं. झी 24 तासच्या या वृत्तानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आली आणि जलपर्णी काढण्याचं काम पालिकेनं हाती घेतलं आहे.
नागरिकांनीही जलपर्णी काढण्याच काम सुरु झाल्यामुळं समाधान व्यक्त केलंय. तसंच झी 24 तासचे आभारही मानले आहेत. उशिरा का होईना महापालिकेला जाग आली आहे. पण प्रत्येकवेळी प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतरच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणार का, याचा विचार महापालिकेनं करायला हवा.