नांदेडला सापत्न वागणूक

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलय. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालीये.

Updated: Mar 12, 2012, 10:10 PM IST

www.24taas.com, केशव घोणसे पाटील, नांदेड

मराठवाडा रेल्वे विभाग तसा कायम दुर्लक्षितच राहिलाय. नांदेड महाराष्ट्रात असला तरी नांदेड दक्षिण मध्य रेल्वेला जोडण्यात आलय. हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेडला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालीये. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मराठवाड्याच्या जनतेच्या माफक अपेक्षा आहेत.

 

मागण्यांसाठी सातत्यानं संघर्ष करणारा मराठवाड्यातला नांदेडचा रेल्वे विभाग सर्वांना परिचित आहे..... हमखास आंदोलन केल्याशिवाय कोणताही मागणी पूर्ण होत नाही हा इथल्या रेल्वे प्रवाशांचा अनुभव..... हैदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत येणा-या नांदेड विभागावर कायम अन्यायच झालाय. दररोज 65 गाड्यांची ये जा होणा-या नांदेडहून पुण्याला दररोज जाण्यासाठी रेल्वे गाडी नाही. शिवाय संध्याकाळी नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे नाही. नांदेड हे शिखांची दक्षिण काशी मानली जातेय. मराठवाड्य़ातील मोठं सामाजिक, आर्थिक आणि व्यापारी शहर असलेल्या नांदेडच्या रेल्वेसेवेचा विकास यथा तथाच झालाय. यंदाच्या रेल्वेअर्थ संकल्पाकडून मराठवाड्यातील जनतेच्या खास अशा अपेक्षा आहेत

 

मराठवाडा रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा. मुंबईसाठी थेट नांदेडहून रेल्वे सोडावी. नांदेड -मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरु करण्यात यावी, नांदेड- पुणे दररोज रेल्वे गाडी सुरु करावी. शिख भाविकांसाठी नांदेड-बीदर रेल्वेमार्ग सुरु करावा. मुदखेड- नांदेड- परभणी या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्यात यावं या अनेक मागण्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्या प्रलंबित आहेत.

 

मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांची यादी न संपणारी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात किमान काही प्रमुख मागण्या तरी पूर्ण होतील अशी अपेक्षा मराठवाड्यातील जनतेकडून व्यक्त केली जातेय.

 

मराठवाड्याच्या मागण्या

मराठवाडा रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडावा

मुंबईसाठी थेट नांदेडहून रेल्वे सोडावी.

नांदेड -मुंबई सुपरफास्ट रेल्वे हवी

नांदेड- पुणे रोज रेल्वे सुरु करा

नांदेड-बीदर रेल्वेमार्गाचे काम सुरु करा

मुदखेड- नांदेड- परभणी मार्ग दुपदरी करावा