युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये १५ % वाढ

देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीय.

Updated: Dec 8, 2011, 04:39 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात, म्हणजेच १९९८च्या तुलनेत २०१० मध्येगुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीए आणि युपीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीय.

 

देशाची मागील बारा वर्षात वेगानं आर्थिक प्रगती झाली. मात्र याच काळात, म्हणजेच १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्येही तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. एनडीए आणि युपीएच्या कार्यकाळाचा विचार करता, युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालीयदेशाच्या आर्थिक विकासाचा विचार करता १९९८-९९ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ५.७ टक्के होता. तो २०१० - ११ मध्ये ८.५ टक्क्यांवर पोचला. तर दुसरीकडं याच काळात म्हणजेच १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्ये तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. यात बलात्कार, चोरी, दरोडा,हुंडा यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  १९९८ मध्ये खूनाच्या ३८,६५३घटना घडल्या. २०१०मध्ये ही संख्या ३३,३३५ इतकी होती. यात तेरा टक्क्यांनी घट झाली. तर १९९८ मध्ये बलात्काराच्या १५,०३१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१० मध्ये ती संख्या २२,१७२ म्हणजेच तब्बल ४७ टक्क्यांनी वाढ झाली. एकंदरीतच आयपीसीनुसार १९९८ मध्ये देशभरात १७,७९,१११ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०१० मध्ये गुन्ह्यंची संख्या तब्बल२२,२४,८३१ वरपोचली. म्हणजेच यात २५ टक्क्यांनी वाढ झाली.

 

दुसरीकडं एनडीए आणि युपीएच्या कारकिर्दीतल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर दिसतं की एनडीएच्या कार्यकाळात आयपीसीनुसार देशभरात एकूण १,०५,८०,५८२ गुन्ह्यांची नोंद झाली. तर युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांची संख्या १,२१,३०,१२३ इतकी झाली. म्हणजेच त्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली. एकंदरीतच या आकडेवारीवरूनएनडीएच्या काळात गुन्ह्यांवर अंकूश होता हे स्पष्ट होतंय. देशाच्या आर्थिक विकासाचा विचार करता १९९८-९९ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ५.७ टक्के होता. तो २०१० - ११ मध्ये ८.५ टक्क्यांवर पोचला. तर दुसरीकडं याच काळात म्हणजेच १९९८च्या तुलनेत २०१० मध्ये गुन्ह्यांमध्ये तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाली. यात बलात्कार, चोरी, दरोडा, हुंडा यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  १९९८ मध्ये खूनाच्या ३८,६५३ घटना घडल्या. २०१०मध्ये ही संख्या ३३,३३५ इतकी होती. यात तेरा टक्क्यांनी घट झाली. तर १९९८ मध्ये बलात्काराच्या १५,०३१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१० मध्ये ती संख्या २२,१७२ म्हणजेच तब्बल ४७ टक्क्यांनी वाढ झाली.

 

एकंदरीतच आयपीसीनुसार १९९८ मध्ये देशभरात १७,७९,१११ गुन्ह्यांची नोंद झाली. तर २०१० मध्ये गुन्ह्यंची संख्या तब्बल २२,२४,८३१ वर पोचली. म्हणजेच यात २५ टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडं एनडीए आणि युपीएच्या कारकिर्दीतल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकू यात. एनडीएच्या कार्यकाळात आयपीसीनुसार देशभरात एकूण १,०५,८०,५८२ गुन्ह्यांची नोंद झाली. तर युपीएच्या कार्यकाळात गुन्ह्यांची संख्या १,२१,३०,१२३ इतकी झाली. म्हणजेच त्यात १५ टक्क्यांनी वाढ झाली. एकंदरीतच या आकडेवारीवरून एनडीएच्या काळात गुन्ह्यांवर अंकुश होता हे स्पष्ट होतंय.