ऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 15, 2012, 08:37 PM IST

www.24taas.com,कोल्हापूर
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.
भुदरगड तालुक्यात शेतकरी आणि पोलीस आमनेसामने उभे ठाकले. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांवर दगडफेक केली. तर त्याच्या प्रतिऊत्तरात पोलिसांनी हवेत एक राऊंड फायर केला. त्याचबरोबर आंदोलकांना थांबवताना त्यांच्यावर लाठीमार केला. यामध्ये दोन पोलीस आणि चार शेतकरी किरकोळ जखमी झालेत.
पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात सत्त्रहून अधिक शेतक-यांना अटक केली. उद्याही आंदोलन करणार असल्याचं शेतक-यांनी जाहीर केलय.