एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय. अशा प्रसंगी महाराष्ट्र सरकार झोपेचं सोंग घेतंय का? शेतकऱ्यांच्या शिमग्याकडे दुर्लक्ष करत मंत्री दिवाळी साजरी करण्यात दंग आहेत का? तुम्हाला काय वाटतं? काय आहे तुमचं मत?