www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या स्टिंग रे नावाचे मासे चावलेत. ३५ ते ४० भाविकांना हे मासे चावल्याचं समजतंय. त्यांच्यापैकी काही जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर एकच गर्दी केली होती. विसर्जनासाठी पाण्यात शिरलेल्या भक्तांना काही तरी चावल्यासारखं जाणवलं. त्यानंतर समुद्रात मासे चावत असल्याची तक्रार घेऊन काही जण पालिका अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले. त्यानंतर सुरुवातीला जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये ३३ जणांना दाखल करण्यात आलं. त्यानंतर जेजे हॉस्पिटलमध्ये १ तर सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये ११ जणांना दाखल करण्यात आलं.
या सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले आहे. यातील कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचेही समजते. मासे चावल्यावर आग होणे, प्रचंड दुखणे असे होत असल्याचे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी सांगितले. ही घटना समजाताच भक्तगणांनी पाण्यात जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलंय.
कसा असतो स्टिंग रे मासा?
स्टिंग रे म्हणजेच पाकट मासा
स्टिंग रे या माशाच्या शेपटीला काटे असतात
या काट्यांमुळेच इजा होऊ शकते
या काट्यांमध्ये ह्युमोटॉक्सिक नावाचं विष असतं
त्या विषामुळे रक्तपेशींवर परिणाम होतो