दहा प्रमुख लढती : मोदी, सोनिया गांधी, अडवाणींचे भवितव्य पणाला

देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. आज दहा महत्वाच्या ठिकाणी दिग्गज उमेदवार असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी किती टक्के मतदान होते, याची उत्सुकता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 30, 2014, 10:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. आज दहा महत्वाच्या ठिकाणी दिग्गज उमेदवार असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी किती टक्के मतदान होते, याची उत्सुकता आहे.
गुजरात (26 ), जम्मू-काश्मीर व दादरा व नगर हवेली आणि दीव दमणच्या प्रत्येकी एक, पंजाब (13), उत्तर प्रदेश (14), पश्चिम बंगाल (9) तर आंध्र प्रदेश (17) जागा येथे मतदान सुरु झाले आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला , भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली , भाजपचे विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंह, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, श्रीप्रकाश जयस्वाल , मुरली मनोहर जोशी, गायक बप्पी लहरी, ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा, शरद यादव, राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांचा समावेश आहे.
बडोद्यातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे मधुसुदन मिस्त्री यांच्यात लढत होत आहे. तर गांधीनगरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात काँग्रेसचे किरीट पटेल आहेत. लखनऊमधून राजनाथ सिंग यांच्या विरोधात काँग्रेसच्या रीटा बहुगुणा जोशी, नकुल दुबे (बसपा), अशोक बाजपेयी (सपा) आणि जावेद जाफरी (आप) असे उमेदवार आहेत. अमृतसरमधून अरुण जेटली आणि कानपूरमधून मुरली मनोहर जोशी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्या विरोधात श्रीप्रकाश जायसवाल (काँग्रेस), सलीम अहमद (बसपा), सुरेंद्र मोहन अग्रवाल (सपा) आणि डॉ. मुहम्मद हुसैन रेशमी (आप) आहेत.
झांसीमध्ये मुख्य मुकाबला उमा भारती (भाजपा), प्रदीप जैन आदित्य (काँग्रेस), अनुराधा शर्मा (बसपा), चंद्रपाल सिंह यादव (सपा) आणि अर्चना गुप्ता (आप) यांच्या आहे. तर काँग्रेसमधून अध्यक्षा सोनिया गांधी यांचे रायबरेली मतदारसंघातून भवितव्य ठरणार आहे. गांधी यांच्या विरोधात प्रवेश सिंह (बसपा), अजय अग्रवाल (भाजपा) आणि फखरुद्दीन (आप) आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.