काँग्रेसचं `गरज सरो नी वैद्य मरो` - अंतुले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळं बंडाचं निशाण फडकवलं आहे.

Updated: Mar 26, 2014, 12:01 AM IST

www.24taas.com, झी मीडिया
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्यामुळं बंडाचं निशाण फडकवलं आहे.
भाजपपेक्षाही काँग्रेसमध्ये ज्येष्ठांची अवस्था वाईट असल्याचा टोला लगावत अंतुलेंनी लगावला आहे. शेकापचे उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा दिला आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई यांच्यासह शेकाप नेते जयंत पाटील यांनी आज ए.आ.अंतुले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या नेत्यांनी अंतुलेंना रायगड मतदारसंघात शेकापच्या उमेद्वाराला पाठींबा देण्याची विनंती केली आणि, अंतुलेंनी शेकापचे उमेदवार रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलतांना अंतुलेंनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेत घरचा आहेर दिला आहे.
रायगडची जागा राष्ट्रवादीला देताना साधं विचारलंही नाही. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीला जागा देऊन काँग्रेसनं रायगडला आपली दफनभूमी केल्याचा आरोपही ए.आर. अंतुलेंनी केलाय.

रायगडच्या हितासाठी सर्वांनी तटकरेंचं राजकीय दफन करणं गरजेचं असल्याचं सांगत ए आर अंतुलेंनी तटकरेंवर घणाघाती टीका केली.
तटकरेंना मी राजकारणात आणलं, पण त्यांच्याच कृतीमुळं रायगडच्या प्रतीमेला काळीमा फासली गेली असल्याचं मतंही यावेळी ए.आर.अंतुले यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसची `गरज सरो नी वैद्य मरो` ही संस्कृती असून भाजपपेक्षाही काँग्रेसमधल्या ज्येष्ठांची वाईट अवस्था असल्याचा टोला अंतुलेंनी लगावला.
पक्षानं आपल्यावर कारवाई केली तरी त्याची आपल्याला चिंता नसल्याचं सांगायलाही अंतुले विसरलेले नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.