www.24taas.com, झी मीडिया, भटकळ
कर्नाटकच्या समुद्र किनारी असलेल्या भटकळ या गावातून 25 वर्षांच्या एमबीएच्या विद्यार्थ्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना भावी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर आपत्तिजनक एमएमएस प्रसार केल्याबद्दल अटक करण्यात आले.
भटकळ येतील प्रसिद्ध कवि समिउल्ला बरमावर यांचा मुलगा वकास बरमावर आणि त्याच्या चार मित्रांना बंगळुरूमधील एका अपार्टमेंटमधून शहर पोलिसांना अटक केले आहे. वकासच्या चार मित्रांना पोलिसांनी रविवारी चौकशीनंतर सोडून दिले. पण वकास अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगावच्या खानपूरमध्ये वकासला चौकशीसाठी नेण्यात आले होते.
एमएमएसमध्ये एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाला मोदींचा चेहरा जोडून भाजपचे इलेक्शन स्लोगन असलेल्या `अबकी बार मोदी सरकार` च्या धर्तीवर लिहण्यात आले. `अबकी बार अंतिम संस्कार`. असा एमएमएस तयार करून व्हॉट्स अप ग्रुपवर पाठविण्यात आला होता. हा ग्रुप आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हँडल करीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चुकीने हा एमएमएस एका भाजप समर्थकाकडे पोहला. त्यानंतर त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
सिनिअर पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अटकेबाबत दुजोरा दिला. या अटकेमुळे कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते संताप व्यक्त करीत आहेत. त्यांच्यानुसार ही इमेज राजकारण व्यंग्यच्या रुपात होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.