ऑडिट मतदारसंघाचं : अकोला

ऑडिट मतदारसंघाचं - अकोला

Updated: Apr 4, 2014, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अकोला
अमरावती मतदार संघात एकेकाळी काँग्रेसचे विदर्भातील मातब्बर नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे वसंत साठेंनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंयं..माजी खासदार वसंत साठेंचा एकेकाळी दिल्ली दरबारी दबदबा असायचा, काँग्रेसचा हा पारंपरिक बालेकिल्ला होता..पाहूयात कोणता हा मतदारसंघ?
विविध धर्मांचा गर्भ म्हणजे विदर्भ असं म्हटलं जातं.. याच विदर्भातला हा अकोला लोकसभा मतदारसंघ म्हणजे विदर्भाची राजकीय समीकरणं बदलणारा मतदारसंघ. शेती हा इथला मुख्य उद्योग... इथला डाळ उद्योग देशात दुस-या क्रमांकाचा मानला जातो. याशिवाय कापूस आणि सोयाबीनवर प्रक्रिया करणारे काही उद्योगही जिल्ह्यात आहेत. नागपूरनंतर विदर्भातील दुस-या क्रमांकाचं औद्योगिक शहर अशी अकोल्याची ओळख.
विदर्भातील अमरावती विभागात असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ. पुनर्रचनेनंतर संपूर्ण अकोला जिल्हा आणि वाशीम जिल्ह्यातील विधानसभेचा रिसोड मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनलाय. या मतदारसंघानं नेहमीच विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिलाय.
 
अकोला लोकसभा मतदारसंघ अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व), अकोट, बाळापुर, मुर्तीजापूर (राखीव - एस.सी.) या विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनला आहे.
2009 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 14 लाख 80 हजार 606 आहेत त्यापैकी
पुरूष मतदार 7  लाख 68 हजार 569  तर महिला मतदार
7 लाख12 हजार 37  इतकी आहे.
कुणाचं किती टक्के मतदान?
मराठा - 25 टक्के, 
कुणबी - 12 टक्के, 
दलित - 20 टक्के, 
आदिवासी - 08 टक्के, 
इतर(अल्पसंख्याक) - 35 टक्के इतकी आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. काँग्रेसचे विदर्भातील मातब्बर नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे वसंत साठे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. नव्वदीच्या राजकीय ध्रुवीकरणानंतर मात्र काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडलंयं.
या मतदारसंघातून 1977 मध्ये वसंत साठे  काँग्रेसचे खासदार होते. तर 1980 आणि 1984 मध्ये मधुसूदन वैराळे हे काँग्रेसचे खासदार होते.
  
त्यानंतर मात्र  या मतदारसंघाला खिंडार पडलं. भाजपचे पांडुरंग फुंडकर हे 1989,1991,1996 मध्ये तीनदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे 1998 आणि 1999 मध्ये दोनदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. मग 2004 आणि 2009मध्ये भाजपचं कमळ पुन्हा फुललं.. संजय धोत्रे हे सलग दोनदा लोकसभेत अकोल्याचं प्रतिनिधीत्व करतायत.
हा मतदारसंघ कायमच `खास` लढतींसाठी नावाजलेला आहे. काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ आणि भाजप अशी तिरंगी लढत येथे नेहमीच पाहायला मिळते. आता पुढच्या वेळी अकोल्याचे मतदार नेहमीप्रमाणे धक्कादायक निकाल देतात की भाजपचं कमळ तिस-यांदा फुलवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वडिल काँग्रेसचे दोन वेळा आमदार होते तर काका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री आणि विदर्भाचे मातब्बर नेते...विदर्भातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील नावाजलेलं कुटुंब....अकोला लोकसभा मतदारसंघाच्या या कुटुंबातील विद्यमान खासदारांची ओळख
खासदार संजय श्यामराव धोत्रे
नाव - खा. संजय श्यामराव धोत्रे
जन्म - 26 फेब्रुवारी 1959
वय -  54 वर्षे
शिक्षण - बी.ई (मेकॅनिकल)
अकोला जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील धोत्रे कुटुंबीय.विद्यमान खासदार संजय श्यामराव धोत्रे हे दुस-या पिढीचे नेते आहेत. संजय धोत्रे यांचे वडील शामराव धोत्रे हे मुर्तीजापूर मतदारसंघातून दोनदा काँग्रेसचे आमदार होते. तर त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंत धोत्रे हे देखील सहकार आणि राजकीय क्षेत्रातलं अतिशय मोठे नाव आहे.
व्यवसायाने अभियंते आणि शेतकरी असणारे संजय धोत्रे यांनी महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमधून पूर्ण केलं.1999 ते 2004 या काळात मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून खा. धोत्रे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार झाले. सध्या अकोल्याचे खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर ते लागोपाठ दोनवेळा निवडून आलेत.
खा. संजय धोत्रेंना अध्यात्माची आणि योगासनांची आवड आहे.  तसेच  पुस्तके  वाचनाची आणि प्रवासाची आवड आहे. क्रिकेट आणि टेनिस हे आवडते खेळ आहेत.
 
2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असणा-या संजय धोत्रे यांना 2 लाख 87 हजार 526 मते मिळाली तर