www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात १९ मतदार संघांचा समावेश आहे. मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, औरंगाबाद, दिंडोरी, पालघर, कल्याण, ठाणे रायगड, नाशिक, भिवंडी, जालना या तिसऱ्या टप्प्यातील मतदार संघात २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
पाहुयात, तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील बिग फाइट...
उत्तर-पूर्व मुंबई
संजय दिना पाटील, राष्ट्रवादी विरूद्ध किरीट सोमय्या, भाजप विरूद्ध मेधा पाटकर,आप
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत,शिवसेना मीरा सन्याल, आप, मिलिंद देवरा (शक्यता) ,काँग्रेस
दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे, शिवसेना विरूद्ध एकनाथ गायकवाड (शक्यता),काँग्रेस विरूद्ध आदित्य शिरोडकर (शक्यता),मनसे
उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी, भाजप विरूद्ध निश्चित नाही,मनसे विरूद्ध संजय निरुपम ? काँग्रेस
वायव्य मुंबई
गजानन कीर्तीकर, शिवसेना विरूद्ध गुरुदास कामत(शक्यता), काँग्रेस विरूद्ध मयांक गांधी,आप
उत्तर-मध्य मुंबई
निश्चित नाही, भाजप विरूद्ध प्रिया दत्त ? काँग्रेस
कल्याण
आनंद परांजपे, राष्ट्रवादी विरूद्ध डॉ.श्रीकांत शिंदे शिवसेना विरूद्ध उमेदवार कोण? मनसे
ठाणे
राजन विचारे, शिवसेना विरूद्ध संजीव नाईक, राष्ट्रवादी विरूद्ध संजीव साने,आप
पालघर
चिंतामण वनगा, भाजप विरूद्ध निश्चित नाही काँग्रेस
रायगड
अनंत गिते शिवसेना विरूद्ध सुनील तटकरे (शक्यता) राष्ट्रवादी
औरंगाबाद
चंद्रकांत खैरे, शिवसेना विरूद्ध सुभाष लोमटे आप विरूद्ध उमेदवार कोण?, काँग्रेस
जालना
रावसाहेब दानवे,भाजप विरूद्ध दिलीप म्हस्के, आप विरूद्ध उमेदवार कोण?काँग्रेस की एनसीपी?
धुळे
सुभाष भामरे, भाजप विरूद्ध अमरीश पटेल(शक्यता) काँग्रेस
जळगाव
ए टी पाटील, भाजप विरूद्ध सतीश पाटील, राष्ट्रवादी
रावेर
हरिभाऊ जावळे, भाजप विरूद्ध मनीष जैन, राष्ट्रवादी
नंदूरबार
माणिकराव गावित, काँग्रेस विरूद्ध निश्चित नाही, भाजप
नाशिक
छगन भुजबळ राष्ट्रवादी विरूद्ध विजय पांढरे आप विरूद्ध हेमंत गोडसे,शिवसेना
दिंडोरी
हरिश्चंद्र चव्हाण, भाजप विरूद्ध डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी
दुसऱ्या टप्प्यात अधिसूचना जारी करण्याची तारीख आहे २९ मार्च तर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल ५ एप्रिल... या टप्प्यातील इच्छुक उमेद्वारांच्या अर्जांची छाननी ७ एप्रिलपर्यंत होईल तसंच ९ एप्रिलपर्यंत या टप्प्यातील उमेद्वारांना अर्ज मागे घेता येऊ शकतील. २४ एप्रिलाल या टप्प्यातील मतदार आपली मतं नोंदवतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.