मनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेलीय - मुंडे

`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 5, 2014, 07:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
नुकत्याचा झालेल्या, भाजपचे नितीन गडकरी आणि मनसेचे राज ठाकरे यांच्या `गुप्त` न राहिलेल्या भेटीमुळे महायुतीत काही काळ तणाव निर्माण झाल्याचं जाणवलं. उद्धव ठाकरेही या भेटीमुळे काहिेसे चिंतातूर झालेले दिसले. राज ठाकरे - गडकरी भेटीनंतर काही नवीन राजकीय समीकरणंही तयार होऊ शकतात, अशीही शंका उपस्थित केली जाऊ लागली.
पण, राज ठाकरेंच्या महायुतीत येण्यासंदर्भातल्या सर्व वृत्तांना आता पूर्णविराम लागलाय. भाजपचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मनसेचा महायुतीत समावेश होण्याची शक्यताही फेटाळून लावलीय. आता वेळ निघून गेलीय, असं म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. तर दुसरीकडे शरद पवारांनाही एनडीएत घेणार नसल्याचं मुंडेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.
राज-गडकरींच्या भेटीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं भाजपमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर गडकरींनी मनसेला लोकसभा निवडणुका न लढण्याचं आवाहनही केलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.