www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
यादव ढाब्यात `अब की बार मोदी सरकार`चा शिक्का मारून चपाती विकली जात होती. ही चपाती विकत घेण्यासाठी लोकांची ढाब्याच्या बाहेर लांबच लांब रांग लावली होती. दोन दिवसात या चपातीमुळे ढाब्याने चांगलाच फायदा करून घेतला. पण गुरूवारी प्रशासनाने या चपाती विकण्यावर बंदी घातली. प्रशासनाने मोदी नावाची चपाती विकू नका,` असा आदेश ढाब्याच्या मालकास दिला.
ढाबा मालकाने सांगितलं की, `प्रशासनाने मला चपाती बनवण्याची मशीन जप्त करण्याची किंवा सरळ ढाबाच बंद करण्याची तंबी दिली.` या आधी देखील लखनऊमध्ये असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी राहुल आणि मोदींच्या नावाची थाळी मिळत होती. याला काही विरोधकांनी आक्षेप घेतला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.