www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राष्ट्रवादीचे मंत्री डॉ.विजय कुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हीना गावित यांना नंदुरबारमधून भाजप़कडून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
हीना गावित या यापूर्वीही भाजपच्या कार्यालयात दिसून आल्या होत्या. यावर अजित पवार यांनी विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांनी भाजपकडून निवडणूक लढवली तर विजयकुमार गावित यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, असा इशारा दिला होता. तसेच डॉ.विजयकुमार गावित ही वेळ येऊ देणार नाहीत, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं.
मात्र आज दिल्लीच्या भाजप कार्यालयात जाऊन हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर डॉ. विजयकुमार गावित हे मंत्रिमंडळातून बाहेर पडतात की, राष्ट्रवादी त्यांची हकालपट्टी करते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.