एकेकाळी भारतीय राजकारणावर चंद्राबाबू नायडू यांचा दबदबा होता. देशातील दिग्गज राजकारण्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं, त्यांना सीईओ ऑफ आंध्र प्रदेश म्हटलं जात होतं. एऩडीए सरकारवर वचक ठेवण्यापर्यंत त्यांची राजकीय शक्ती होती.
मात्र त्यानंतर आता गोदावरी नदीतून बरंच पाणी वाहून गेलंय, गोदावरीच आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यात नदी विभागली गेली आहे आणि चंद्राबाबूंनी आपला राजकीय संघर्ष सुरूच ठेवलाय.
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दोन वेळेस आंध्रचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. चंद्राबाबूंनी 1995 ते 2004 दरम्यान मुख्यमंत्रीपद भूषवलंय. आता छोट्या आंध्रप्रदेशचं मुख्यमंत्रीपद त्यांना भूषवता येईल, अशी अपेक्षा त्यांना आहे.
चंद्रबाबू नायडू यांनी त्यांच्या सासऱ्यांच्या मार्ग दर्शनाखाली राजकारणाला सुरूवात केली, चंद्राबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 रोजी झाला. एनटी रामाराव यांनी त्यांना पक्षप्रमुख केल्यानंतर 1994 मध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत चंद्राबाबूंना पोहोचवलं.
चंद्राबाबू नायडू यांनी सर्वात आधी 1998 च्या निवडणुकीत भाजपशी हातमिळवणी केली होती, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर 2004 पर्यंत टीडीपी किंगमेकर ठरला. मात्र 2004 मध्ये टीडीपीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू एनडीएसाठी पुन्हा एकदा किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे. केंद्रात चंद्राबाबूंना पुन्हा मानाचं स्थान मिळेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.