मोदींपुढे मित्र पक्षांचं पाठबळं हे एक आव्हान?

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपला मित्र पक्षांची मदत महत्वाची ठरणार आहे. कारण यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांना ही सरकार स्थापण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एका मताने बहुमताचा प्रस्ताव बारगडला होता, हा इतिहास आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 4, 2014, 10:15 PM IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपला मित्र पक्षांची मदत महत्वाची ठरणार आहे. कारण यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी यांना ही सरकार स्थापण्यासाठी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. एका मताने बहुमताचा प्रस्ताव बारगडला होता, हा इतिहास आहे.
मात्र पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांचा विरोध करून पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार एनडीएतून बाहेर पडले. भाजप आणि एनडीएची ही मैत्री 17 वर्षांची होती. मात्र दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान हे एनडीएला जोडले गेले.
मॅजिक फिगर मिळवणे तसं सोपं नाही, हा अनुभव यापूर्वीही एनडीएला आला आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीचं कॅम्पेन सुरू करण्यापूर्वी दक्षिण भारतातील नेत्यांची भेट घेऊऩ जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नरेंद्र मोदी यांना याचा फायदा निश्चितच एनडीए बहुमताच्या आसपास, किंवा भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, तर बहुमत सिद्ध करण्यासाठी कामाला येणार आहेत.
वाजयपेयीच्या सरकारमध्ये एनडीएकडे 269 जागा होत्या, तेलगू देसमच्या 29 खासदारांचाही वाजपेयी सरकारला पाठिंबा होता, या बळावर वाजपेयींनी 1999 ते 2004 दरम्यान सरकार चालवलं.
दुसरीकडे बंगालमधून ममता बॅनर्जी या एनडीएसोबत येतील असं सध्या तरी वाटत नाही, त्यांना मुस्लिम मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याने, भगव्या पक्षाशी आपलं जमणार नसल्याचं यापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.