दोन्ही काँग्रेसची बैठक, मुंडेची बैठकीवर टीका

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काल तातडीची बैठक झाली. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 12, 2014, 10:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काल तातडीची बैठक झाली. शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित होते. विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
19 जुलैला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुक होणार आहे. काही दिवसंपापूर्वी काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुक स्वबळावर लढवण्याचे संकेत मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा झाली.
राज्य सरकारची निर्णय प्रक्रिया वेगवान करावी याबबातही चर्चा करण्यात आली. मुंबई, ठाणे, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसंच अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी याबाबतही चर्चा करण्यात आली.
मुंबईत काल राष्ट्रवादीची पार पडलेली बैठक म्हणजे शरद पवारांना उशिरा सुचलेल शहाणपण आहे. आता वेळ निघुन गेलीय. जे १५ वर्ष सत्तेत असताना काहीच करू शकले नाहीत ते दोन महिन्यात काय करतील अशी खरमरीत टीका मुंडेनी केलीय. मुंडे काल सपत्नीक साईदर्शनासाठी शिर्डीत आले असता ते बोलत होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.