लोकसभेसाठी `आप`चे महाराष्ट्रातून सहा उमेदवार जाहीर

आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातून लोकसभेचे आणखी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रतिभा शिंदे, अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 15, 2014, 08:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठी ५५ जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील सहा उमेदवारांचा समावेश आहे.
आपने गाझियाबादमधून शाजिया इल्मी यांना उमेदवारी दिली आहे. तर बस्तरमदून सोनी सोनी यांनी पक्षाने रिंगणात उतरवले आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची ‘आप’ची ही सहावी यादी आहे.
आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातून लोकसभेचे आणखी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रतिभा शिंदे, अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या लोकसभा उमेदवारीमुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील जादू महाराष्ट्रात चालेल का, याचीच चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुंबई आणि मराठवाडा दौरा केला.
महाराष्ट्रातून
- रावेर मतदार संघ - प्रतिभा शिंदे
- अहमदनगर - दीपाली सय्यद
- पालघर -पांडुरंग पारधी
-जळगाव - संग्राम पाटील
- अकोला - अजय पंजाबराव हिंगलेकर
- वर्धा - मोहम्मद अलीम पटेल

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.