www.24taas.com, झी मीडिया, अकोला
दुपारी 4 वाजता अपडेट
संजय धोत्रे 2 लाख 4 हजार 116 मतांनी विजयी
सकाळी १० वाजता अपडेट
अपडेट - भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर
मतदारसंघ : अकोला
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६५ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस/राष्ट्रवादी – हिदायत पटेल (काँग्रेस)
महायुती – संजय धोत्रे (भाजप)
आप – अजय पंजाबराव हिंगणकर
भारीप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर
अपक्ष - अजय हिंगलेकर
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
संजय धोत्रे – भाजप - २,८७,५२६ मतं – ३८.९१%
प्रकाश आंबेडकर - भारिप बहुजन महासंघ – २,२२,६७८ – ३०.१३%
बाबासाहेब धाबेकर – काँग्रेस – १,८२,७७६ – २४.७३%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १,४८,०६,००६
पुरुष : ७,६८,५६९
महिला : ७,१२,०३७
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
भाजपचे संजय धोत्रे हे खासदार असल्याचा टेंभा न मिरवणारे आणि साधे वागणारे असा त्यांचा लौकिक. ग्रामीण भागातील मतदारांच्या भरवशावर आपला विजय अवलंबून आहे याची जाण असल्याने ते प्रत्येकाच्या संपर्कात असतात.
भाजप, काँग्रेस आणि भारिप अशी लढत येथे कायमच होत आली आहे. त्याचा लाभ भाजपला होतो.
अकोला जिल्ह्य़ात काँग्रेसची संघटनात्मक अवस्था फारच कमकुवत झाली आहे. जिल्ह्य़ातून पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. याउलट प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत.
जिल्ह्य़ात भाजपचे संघटन चांगले आहे.
प्रकाश आंबेडकर यांची राज्यात केवळ अकोला जिल्ह्य़ात चांगली ताकद
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.