www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
सायंकाळी ५.०० वाजता अपडेट
अहमदनगर भाजपचे दिलीप गांधी २ लाख ८ हजार ४०७ मतांनी विजयी
दुपारी १२.३० वाजता अपडेट
Ø अहमदनगर - सातव्या फेरीअखेर भाजपचे दिलीप गांधी ५६,८०४ मतांनी आघाडीवर
सकाळी १०.०० वाजता अपडेट
Ø पश्चिम महाराष्ट्रात १२ पैकी ८ जागांवर महायुतीला आघाडी
सकाळी ९.०० वाजता अपडेट
Ø अहमदनगरमधून भाजपचे दिलीप गांधी आघाडीवर
मतदारसंघ : अहमदनगर
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६० टक्के मतदान
उमेदवार :
आघाडी – राजीव आप्पासाहेब राजळे (राष्ट्रवादी)
महायुती – दिलीप गांधी (भाजप)
आप – दिपाली सय्यद
बसपा - किसन काकडे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
दिलीप गांधी – भाजप – ३,१२,०४७ मतं – ३९.६५ %
शिवाजी करडिले – राष्ट्रवादी – २,६५,३१६ मतं – ३३.७१%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,१७,९५१
पुरुष : ७,८९,८९७
महिला : ७,२८,०५४
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
दुरंगी लढत झाल्यास काँग्रेस आघाडीला यश मिळते तर तिरंगी लढत झाल्यास भाजपचा उमेदवार निवडून येतो हा अनुभव लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये आला
नगर जिल्हा राजकीयदृष्टय़ा जागृत मानला जातो. यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्यात १९९१च्या निवडणुकीनंतर झालेली कायदेशीर लढाई देशभर गाजली होती. गडाख विरुद्ध विखे-पाटील यांच्यातील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळेच देशात निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली.
राज्याच्या राजकारणात शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे-पाटील यांचे राजकीय हाडवैर प्रसिद्ध आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर विखे-पाटील यांचा पत्ता कापण्याकरिताच राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केला आणि शेजारील शिर्डी (राखीव) काँग्रेसला सोडला.
यंदा कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायची हा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.
विखे-पाटील यांचा गट राष्ट्रवादीला अपशकुन करण्याची संधी सोडणार नाही हेही तितकेच सत्य.
गेल्या वेळी अपक्ष लढून सुमारे सव्वा लाख मते मिळविलेले माजी आमदार राजीव राजळे यांना उमेदवारी द्यावी, असा राष्ट्रवादीत मतप्रवाह आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा पर्याय पुढे येऊ शकतो.
दुरंगी लढत व्हावी, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असला तरी काँग्रेसचे नेते जुने हिशेब चुकते करण्याच्या तयारीत आहेत.
तिरंगी लढत झाल्यास भाजपचे दिलीप गांधी यांचा मार्ग सुकर होऊ शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.