www.24taas.com, झी मीडिया, बीड
बीडमधून गोपीनाथ मुंडे आघाडीवर
दुपारी 05.13 अपडेटगोपीनाथ मुंडे आघाडीवर, गोपीनाथ मुंडे विजयी, मुंडेंना 2 लाख 31 हजार 015 मतं, तर राष्ट्रवादीचे सुरेश धस यांना 1 लाख 68 हजार 065 मतं
गोपीनाथ मुंडे आघाडीवर 8.54 AM
मतदारसंघ : बीड
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ६४ टक्के मतदान
मतमोजणी प्रक्रिया
बीडमध्ये प्रत्येक लोकसभा मतदार संघात १६ याप्रमाणे ९६ टेबलांवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या २६ फेऱ्या होतील. प्रथम पोस्टल मतमोजणी होणार आहे.
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – सुरेश रामचंद्र धस (राष्ट्रवादी)
महायुती – गोपीनाथ मुंडे (भाजप)
आप – नंदू माधव
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
गोपीनाथ मुंडे – भाजप – ५,५३,९९४ मतं – ५१.५८%
रमेश कोकाटे – राष्ट्रवादी – ४,१३,०४२ मतं – ३८.४६%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,४८,४१४
पुरुष : ७,६४,३७४
महिला : ६,८४,०४०
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
मुंडे हे राज्याच्या राजकारणात तर बंधू आणि पुतण्या त्यांचे जिल्ह्य़ाचे राजकारण सांभाळत होते...
आता बंधू आणि पुतण्या धनंजय हे दोघेही राष्ट्रवादीच्या कळपात गेले आहेत. अर्थात जिल्ह्य़ाच्या राजकारणावर गोपीनाथरावांचा अद्यापही चांगला पगडा आहे.
उमेदवारी आणि अलीकडेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीने सुरेश धस या मराठा समाजातील नेत्याला संधी दिली. पण धस यांचा मुंडे यांच्यापुढे टिकाव लागण्याबाबत साशंकताच आहे.
विशेष म्हणजे गेल्या वेळी राष्ट्रवादीने बीडची लढत प्रतिष्ठेची करूनही राष्ट्रवादीच्या जिल्ह्य़ातील काही बडय़ा नेत्यांनी मुंडे यांनाच पडद्याआडून मदत केली होती. याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या निवडणुकीत आठ कोटी खर्च झाल्याची कबुली दिल्याने मुंडे हे अडचणीत आले. यंदाही सारी ‘ताकद’ पणाला लावल्याशिवाय मुंडे राहणार नाहीत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.