LIVE -निकाल बारामती

प्रोफाईल मतदारसंघाचं : बारामती

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बारामती
दुपारी ३.०० वाजता अपडेट
Ø बारामती - सुप्रीया सुळे यांचा ७०,००० मतांनी विजय
सकाळी १०.१५ वाजता अपडेट
Ø महाराष्ट्रात भाजप २२ जागांवर आघाडीवर तर शिवसेनेला १९ जागांवर आघाडी... काँग्रेस १ तर राष्ट्रवादीला ५ जागांवर आघाडी
Ø बारामती - सुप्रीया सुळे ८११८ मतांनी आघाडीवर
सकाळी ९.०० वाजता अपडेट
Ø बारामती - दुसऱ्या फेरीनंतर सुप्रीया सुळे ११,५०० मतांनी आघाडीवर
सकाळी ८.१५ वाजता अपडेट
Ø बारामती - पुरंदर विधानसभा मतदान केंद्रावर महादेव जानकर आघाडीवर
Ø बारामती - बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रीया सुळे आघाडीवर

मतदारसंघ : बारामती
मतदान दिनांक : १७ एप्रिल
एकूण मतदान : ५८.२ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
महायुती – महादेव जगन्नाथ जानकर
आप – आयपीएस खोपडे
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस – ४,८७,८२७ मतं – ६६.४६%
कांता नलावडे – भाजप – १,५०,९९६ मतं – २०.५७%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,९३,४६०
पुरुष : ८,२८,७७६
महिला : ७,६४,६८४
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 विरोधकही बारामतीची जागा निवडून येण्याची शक्यता गृहीत धरत नाहीत.
 पवारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्याचा विरोधकांचा प्रयत्न.
 सुप्रिया सुळे यांच्या स्वभावाबद्दल काही जणांच्या तक्रारी असल्या तरी पवार यांची कन्या असल्याने पक्षाची सारी यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.
 गेल्या निवडणुकीत सुप्रिया यांना सव्वातीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. यंदा ते वाढते की घटते यावरच पवार कुटुंबीयांचा बारामतीवर कितपत प्रभाव आहे हे स्पष्ट होईल.
 यामुळेच मताधिक्य वाढले नाही तरी किमान कायम राहावे हा दादांचा प्रयत्न राहील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.