www.24taas.com, झी मीडिया, भंडारा-गोंदिया
सकाळी 5:10 वाजता अपडेट भंडारा-गोंदिया : भाजपचे नाना पटोले 1,49, 722 मतांनी विजयी, प्रफुल्ल पटेल यांचा पराभव
सकाळी 10.27 वाजता अपडेट भंडारा - गोंदिया - सहाव्या फेरीअखेर नाना पटोले ६,३०० मतांनी आघाडीवर
सकाळी 9:05 वाजता अपडेट भंडारा-गोंदिया राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल पिछाडीवर
सकाळी 7.30 वाजता अपडेट
राष्ट्रवादीचे गोंदियाचे उमेदवार प्रफुल्ल पटेल सिद्धीविनायकाच्या दर्शनाला
मतदारसंघ : भंडारा-गोंदिया
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६१ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – प्रफुल्ल मनोहरभाई पटेल (राष्ट्रवादी)
महायुती – नाना पटोले (भाजप)
अपक्ष – प्रशांत मिश्रा
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
प्रफुल पटेल – राष्ट्रवादी – ४,८९,८१४ मतं – ४७.५२%
नाना पटोले - भाजप – १,५८,९३८ मतं – १५.४२%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १४,५०,४७७
पुरुष : ७,३४,६९८
महिला : ७,१५,७७९
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी ही पटेल यांच्याकडे असते. ‘बडय़ांचे सारेच बडे’ असे नेहमी म्हटले जाते. तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघाबाबत आहे.
या मतदारसंघात हिंदी भाषकांबरोबरच पोवार, दलित, कुणबी आणि लोधी समाजाचे प्राबल्य आहे. पण पटेल यांनी जातीच्या राजकारणावर मात करीत स्वत:चे प्राबल्य निर्माण केले.
काँग्रेसमधून बाहेर पडलेले आमदार नाना पटोले यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून पटेल यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पुढे पटोले हे भाजपमध्ये गेले आणि आमदार म्हणून निवडून आले.
सर्वच दृष्टय़ा ‘भरभक्कम’ असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्यापुढे टिकाव लागणे कठीण असताना पटोले यांनी मात्र पटेल यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
धानाला योग्य भाव मिळत नाही
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत गोसेखुर्द धरणाचे पाणी आजून पर्यंत पोहचले नसून पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नाही
(भंडारा ) करचखेडा लिफ्ट येरिगेशनचे काम अजून पर्यंत अपूर्ण मागचा लोकसभेचा आधी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा हस्ते लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता आजून पर्यंत शेतकर्यांवना पाणी देण्यात आले नाही.
जातीपातीची समीकरणं
लोकसभेच्या समीकरणात भाषीय समीकरणात कुणबी व पोवार समाज बरोबरीत असून अनुसूचित जात एससी ही दुसऱ्या क्रमांकावर असून तिसर्याअ क्रमांकावर तेली समाज आहे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.