LIVE -निकाल दिंडोरी

प्रोफाईल मतदारसंघाचं : दिंडोरी

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दिंडोरी
दुपारी १.०० वाजता अपडेट
Ø दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण २ लाख ४७ हजार मतांनी विजयी
सकाळी ९.०० वाजता अपडेट
Ø दिंडोरी - हरिश्चंद चव्हाण 40 हजार मतांनी आघाडीवर

मतदारसंघ : दिंडोरी (एसटी)
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : 64 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – भारती पवार (राष्ट्रवादी)
महायुती – हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)
बहुजन समाज पक्ष – ज्ञानेश्वर दामू माळी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
हरिश्चंद्र चव्हाण – भाजप – 2,81,254 मतं - 41.26%
नरहरी झिरवाल - राष्ट्रवादी – 2,43,907 मतं - 35.78%
दीपक गांगुर्डे - बसप – 1,05,352 - 15.46%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 14,32,938
पुरुष : 7,37,206
महिला : 6,95,732

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 भाजप आणि राष्ट्रवादी दोघांची प्रतिष्ठा पणाला
 गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळी भाजपचे चव्हाण यांच्या पथ्थ्यावर पडली होती. राष्ट्रवादीने दिंडोरीचे तत्कालीन आमदार नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिली, पण माजी मंत्री ए. टी. पवार हे रुसून बसल्याचा फटका राष्ट्रवादीला बसला होता.
 खासदार चव्हाण यांचा मतदारसंघातील जनसंपर्क हा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो. खासदार चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे.
 दिंडोरी मतदारसंघात मार्क्सनवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे ७५ हजारांपेक्षा जास्त हक्काचे मतदान आहे.
 नाशिक जिल्ह्य़ात मनसेने हातपाय पसरले आहेत. दिंडोरी मतदारसंघात मनसेने ताकद लावल्यास ते भाजपसाठी तापदायक ठरू शकते.
 यंदा राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची करण्यावर भर दिल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
 आदिवासी राखीव मतदार संघ असल्याने कायम उपेक्षा
 ६० टक्के भाग सिंचनापासून वंचित
 भौगोलिक स्थिती भिन्न असतांना मतदार संघ
 रेल्वे मार्गाचे जाळे नाही
 मांजर पद प्रकल्प मतदार संघासाठी वरदान परंतु मत दार संघाला त्याचा लाभ नाही.
 चांदवड येवला वगळता मोठ्या शैक्षणिक संस्था नाही.
 मतदार संघात एकही औध्योगिक वसाहत नाही .
 नांदगाव तालुक्यातील जवळपास ५०- ६० हजार मजूर ६ - ८ महिने उसतोडीसाठी तालुका सोडून राज्य ओ परराज्यात जातात.
जातीपातीची समीकरणं
 मराठा समाजाचे वर्चस्व, आदिवासी राखीव मतदार संघ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.