www.24taas.com, झी मीडिया, हिंगोली
सायंकाळी ६.०० वाजता अपडेट
हिंगोली राजीव सातव अवघ्या १६३२ मतांनी विजयी... महायुतीच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव
दुपारी 05.31 अपडेट हिंगोलीत राजीव सातव अवघ्या 1632 मतांनी विजयी
दुपारी 05.00 अपडेट हिंगोलीत जोरदार चुरस, विसाव्या फेरीत सुभाष वानखेडेंना 4 लाख 18 हजार, 564 मतं, तर 4 लाख 18 हजार 344 मतं, राजीव सातव युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
मतमोजणीला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. याच ठिकाणी पाहा क्षणाक्षणाचे लाइव्ह अपडेट आणि सविस्तर निकाल... F5 बटन दाबून किंवा पेज रिफ्रेश करून अपडेट पाहा
मतदारसंघ : हिंगोली
मतदान दिनांक : 17 एप्रिल
एकूण मतदान : ६३ टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – राजीव सातव (काँग्रेस)
महायुती – सुभाष वानखेडे (शिवसेना)
आप – विठ्ठल नामदेवराव कदम
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
सुभाष वानखेडे – शिवसेना – 3,40,148 - 41.61%
सुर्यकांता पाटील – राष्ट्रवादी – 2,66,514 - 32.60%
डॉ.बी.डी चव्हाण – बसप – 1,11,357 - 13.62%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 13,69,774
पुरुष : 7,05,606
महिला : 6,64,168
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
आलटून-पालटून उमेदवार निवडून देण्याची या मतदारसंघाची परंपरा आहे. यामुळेच शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांचे नशीब फळफळले, असं म्हणायला हरकत नाही
शिवसेनेतील गटबाजी एवढी टोकाला गेली आहे की, जिल्ह्य़ातील सेनेचे दोन माजी आमदारच खासदारांच्या विरोधात आहेत.
डॉ. बी. डी. चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून गटबाजीचा स्तर एवढा खालावला की हे नेते एकमेकांचा उल्लेख एकेरी करतात.
हा मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे.
यूपीए-१ मध्ये राज्यमंत्रीपद भूषविलेल्या राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांनी निवडणुकीची आधीपासूनच तयारी सुरू केली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेस-राष्ट्रवादीत मतदारसंघांची अदलाबदल होऊन कळमनुरी मतदारसंघ सातव यांना मिळाला होता. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती घडली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.