www.24taas.com, झी मीडिया, जालना
दुपारी 03.18 अपडेट जालना- जालना भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे २ लाख १४ हजार मतांनी विजयी, काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पराभूत
दुपारी २.०० वाजता अपडेट - ८ मतदारसंघांचे निकाल हाती
Ø जालना - रावसाहेब दानवे 2 लाख मतांनी विजयी
अपडेट - 09.47 सकाळी, रावसाहेब दानवे आघाडीवर
मतदारसंघ : जालना
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान : 63टक्के मतदान
मतमोजणी
* जालना लोकसभा मतदार संघासाठी १४ टेबलांवर मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या २२ फेऱ्या होतील तर बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या २५ फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी ४०० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर ३०० पोलीस अधिकारी तैनात करण्यात आलेत.
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – विलास औताडे (काँग्रेस)
महायुती – रावसाहेब दानवे पाटील (शिवसेना)
अपक्ष – दीलीप म्हस्के
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
रावसाहेब दानवे – भाजप – 3,50,710 मतं - 44.00%
डॉ.कल्याण काळे - काँग्रेस - 3,42,228 मतं - 42.93%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 14,26,255
पुरुष : 7,51,156
महिला : 6,75,099
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
भाजप बिनधास्त, विरोधक संभ्रमात
या वेळी आघाडीत हा मतदारसंघ कोणी लढवायचा यावरूनच अद्याप एकमत झालेले नाही.
राजेश टोपे यांचे वडील आणि माजी खासदार अंकुशराव टोपे यांचा या मतदारसंघावर डोळा असला तरी त्यांनाही ही निवडणूक सोपी जाणार नाही, अशीच चिन्हे आहेत.
दानवे यांचा मतदारसंघात चांगला संपर्क असला तरी त्यांना राज्याच्या राजकारणात परतण्याचे वेध लागले आहेत.
कारण यापूर्वी त्यांनी आमदारकी भूषविली होती.
सद्य:स्थितीत खासदार दानवे आणि भाजप बिनधास्त, तर विरोधकांमध्ये एकूणच संभ्रमवस्था आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.