LIVE -निकाल कोल्हापूर

प्रोफाईल मतदारसंघाचं : कोल्हापूर

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 10:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर

दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø कोल्हापूर धनंजय महाडिक २९ हजार मतांनी विजयी
सकाळी १०.४५ वाजता अपडेट
Ø कोल्हापूर - धनंजय महाडिक २५ हजार मतांनी आघाडीवर
सकाळी १०.०० वाजता अपडेट
Ø महाराष्ट्रात भाजप १९ जागांवर आघाडीवर तर शिवसेनेला १७ जागांवर आघाडी... काँग्रेस ३ तर राष्ट्रवादीला २ जागांवर आघाडी
Ø पश्चिम महाराष्ट्रात १२ पैकी ८ जागांवर महायुतीला आघाडी
सकाळी ८.३० वाजता अपडेट
Ø कोल्हापुरातून धनंजय महाडीक आघाडीवर

मतदारसंघ : कोल्हापूर
मतदान दिनांक : 17 एप्रिल
एकूण मतदान : ६९.८० टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – धनंजय भीमराव महाडिक
महायुती – संजय सदाशिव मंडलिक (शिवसेना)
आप – नारायण गोंडू पोवार
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
सदाशिव मंडलिक – अपक्ष – 4,28,082 मतं - 41.65%
छ.संभाजीराजे शाहू – राष्ट्रवादी – 3,83,282 मतं - 37.29%
विजय देवने – शिवसेना – 1,72,822 - 16.81%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 15,83,030
पुरुष : 8,01,748
महिला : 7,81,282
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 करवीरनगरीच्या राजकारणाचा बाज नेहमीच वेगळा राहिला आहे. या जिल्ह्य़ातील राजकारण आणि राजकारण्यांचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही.
 राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापूर जिल्ह्य़ात या पक्षाने ताकद उभी केली. पण सदाशिव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातील दरी एवढी वाढत गेली की पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेही काही चालले नाही.
 गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पवार यांनाच आव्हान देत मंडलिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. काँग्रेसच्या त्यांनी पडद्याआडून केलेल्या मदतीने ते निवडून आले. नंतर काँग्रेसच्या गोटात दाखल झाले.
 वयपरत्वे खासदार मंडलिक यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला आहे. यातून बहुधा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेल्या त्यांच्या मुलाचंही नाव उमेदवारीसाठी चर्चेत होतं.
 टोलचा मुद्दा या मतदारसंघात महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात राजकीय लाभ उठविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. या मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघांतून गेल्या वेळी शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या प्रत्येक प्रश्नात शिवसेना आघाडीवर असते. कोल्हापूरचे राजकारण कधी आणि कसे वळण घेईल हे सांगता येत नाही. परिणामी पुढील खासदार कोण हे सारेच अनिश्चित आहे..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.