LIVE -निकालकल्याण

प्रोफाईल मतदारसंघाचं : कल्याण

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 07:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
सकाळी 1.56 वाजता अपडेट
कल्याणमधून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे 2 लाख 15 हजार मतांनी विजयी

सकाळी 12.32 वाजता अपडेट
शिवसेनेचे उमेवार श्रीकांत शिंदे यांना 8 व्या फेरीत 1 लाख 12 हजार मतांची आघाडी
सकाळी 11.00 वाजता अपडेट
पाचव्या फेरीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांची आघाडी
12.32 वाजता अपडेट
शिवसेनेचे उमेवार श्रीकांत शिंदे यांना 4 व्या फेरीत 58621 मतांची आघाडी
12.00 वाजता अपडेट
शिवसेनेचे उमेवार श्रीकांत शिंदे यांना 3 व्या फेरीत 66404 एकून मते पडलीत तर 44081 मतांची आघाडी मिळाली
सकाळी 10.20वाजता अपडेट
कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आघाडीवर कायम, तिसऱ्या फेरीनंतर शिंदे आघाडीवर, 44081 मतांनी घेतली आघाडी
सकाळी 9.00वाजता अपडेट
कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे २८ हजार मतांनी आघाडीवर
सकाळी ८.१५ वाजता अपडेट
Ø कल्याण मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात... 772टपाली मतपत्रिकांचा समावेश

मतदारसंघ : कल्याण
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान : 43 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
महायुती – डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना)
आप – नरेश ठाकूर
मनसे – राजू पाटील
बसपा - अश्फाक अली सिद्दीकी
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
आनंद परांजपे – शिवसेना – 2,12,476 मतं - 39.00%
वसंत डावखरे - राष्ट्रवादी काँग्रेस – 1,88,274 - 34.56%
वैशाली दरेकर-राणे - मनसे
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 15,88,507
पुरुष : 8,57,032
महिला : 7,31,475
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 कळव्यापासून अंबरनाथपर्यंत पसरलेल्या कल्याण मतदारसंघातील लढत यंदा आनंद परांजपे यांच्या भोवताली फिरत राहणार आहे.

 वडील प्रकाश परांजपे यांची पुण्याई आणि शिवसेनेची ताकद या बळावर वसंत डावखरे यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव करून आनंद निवडून आले, पण सुरुवातीच्या काळात मतदारसंघात फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.
 स्वत:चा प्रभाव पाडण्यात अयशस्वी झाल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांचा वापर करून घेतला. यातूनच ठिणगी पडली. शिवसेनेत भरडले जात असल्याने आनंद परांजपे यांची पावले राष्ट्रवादीच्या दिशेने पडू लागली. २०१२च्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या मुख्यालयात शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत आनंद परांजपे हजर झाले आणि त्यांच्या राजकारणाची सारी दिशाच बदलली.
 काहीही झाले तरीही आनंद परांजपे यांना पराभूत करायचे हा शिवसेनेचा निर्धार आहे.
 गेल्या वेळी लाखभर मते मनसेला मिळाली होती. यंदाची त्याकडे लक्ष लागून आहे.
मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
 अनधिकृत बांधकामे, प्रदूषण, कल्याण जंक्शन च्या कायापालाटचा २५ कोटींचा प्रलंबित प्रस्ताव, रस्ते, पाण्याचा प्रश्न
 नियोजनाअभावी जागा दिसेल तिकडे झालेल्या बांधकामांमुळे मुंब्रा-कळवा परिसराला अतिशय बकाल स्वरुप आले आहे.पालिकाही याबाबत तितकिशी कारवाई करताना दिसत नाही.
 लोडशेडिंगबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या सिव्हिक सेन्सअभावी या भागातील घाणीमुळे तिथे ठिकठिकाणी उकिरडा दिसतो
 दाट लोकवस्तीमुळे मुंब्रा येथे आश्रय घेणे गुन्हेगारांच्या पथ्यावर पडले आहे. त्यांना रोखण्यात स्थानिक पोलिसांची यंत्रणा पुरेशी नाही.
 मुंबई हायकोर्टाने २००५ मध्ये शहरातील ८५५ अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश देऊनही राजकीय आशीर्वादाने ती पाडण्यात आली नाहीत. यामागे राजकीय स्वार्थ स्पष्ट दिसत होता.

जातीपातीची समीकरणं
 ब्राह्मणबहुल डोंबिवली, उत्तर भारतीय आणि दक्षिणेतील नागरिकांचे वर्चस्व असलेले कल्याण पूर्व, आगरी मतदारांचे कल्याण ग्रामीण, सिंधीभाषिकांचे उल्हासनगर आणि मुस्लिमांचे मुंब