रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत मनसेकडून `नोटा`

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात मनसे अन्य जागांवर काय भूमिका घेणार, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

Updated: Apr 9, 2014, 10:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मनसेने नोटा वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय, नोटा म्हणजे कोणताही उमेदवार मतदाराला लायक वाटत नसल्यास त्याने नकाराधिकार म्हणजे नोटा वापरावा, नोटा हा पर्याय हा सर्वात खाली दिलेला असतो.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार उतरवला नाही तसेच अन्य पक्षांचा एकही उमेदवार लायक नसल्याने मनसेने या ठिकाणी नोटा म्हणजेच यापैकी कोणीही नाही हा पर्याय वापरण्याची भूमिका घेतली आहे. मनसे इध्यक्ष राज ठाकरे यांनीच तसे आदेश दिल्याचं सांगण्यात येतंय.
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात मनसे अन्य जागांवर काय भूमिका घेणार, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, संभ्रमित मनसेने अखेर `नोटा` वापरण्याचा निर्णय रत्नागिरी-सिंधुदुर्गात घेतला आहे.
रत्नागिरीत पत्रकार परिषदेत पक्षाचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी ही माहिती दिलीय. राज ठाकरे यांचा आदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे, पक्षाचा आदेश डावलणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे उपरकर यांनी सांगितले.
`या मतदारसंघात एक `मौनी बाबा` आणि दुसरा `अजाण` उमेदवार आहे. त्यामुळे लोकांमध्येही संभ्रम आहे. त्यामुळे मनसे आणि मनसेचे मतदार वेगळ्या पद्धतीने मतदानाचा हक्क बजावतील, असंही उपरकर म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.