www.24taas.com, झी मीडिया, वडोदरा
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्या उमेदवारी अर्जावर समर्थक म्हणून शाही परिवारातील एक सदस्य आणि एक चहा विक्रेता सही करणार आहेत.
गुजरातचे ऊर्जा मंत्री सौरभ पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहा विक्रेते असलेले किरण महीडा आणि आणि शाही कुटुंबातील सदस्य शुभांगिनी देवी राजे गायकवाड मोदींच्या अर्जावर समर्थक म्हणून सही करतील. याशिवाय नीला देसाई आणि भाजपचे स्थानिक शहराध्यक्ष भूपेंद्र पटेल हे सुद्धा मोदींच्या अर्जावर सही करतील. नीला या दिवंगत राष्ट्रीय सचिन मकरंद देसाई यांच्या पत्नी आहेत. तर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोदींचा महाराष्ट्रात झंझावात पाहायला मिळेल.. मोदींच्या सांगली आणि लातूरमध्ये सभा होतायत. या सभांची जय्यत तयारी करण्यात आलीय.
वडोदरा लोकसभा जागेवर उमेदवार म्हणून उभे राहणाऱ्या मोदींनी नामांकन पत्र दाखल करण्याआधीच त्यांचे फोटो असलेलेले शहरभरातील जवळजवळ १००० पोस्टर आणि बॅनर झाकून टाकण्यात आलेत. मोदींनी नामांकन पत्र दाखळ केल्यानंतर जर ते दिसले तर त्यांचा खर्चही मोदींच्या निवडणूक खर्चात जोडला जाईल, त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आलीय. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार, एका उमेदवारीच्या निवडणूक प्रचार खर्चाची सीमा जास्तीत जास्त ७० लाख रुपये इतकी निर्धारीत करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.