जेव्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी समोरासमोर येतात

राजकीय स्पर्धक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज समारोसमोर आले आणि त्यांनी एकमेकांना उत्साहाने हस्तांदोलन केलं.

Updated: Jun 9, 2014, 04:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजकीय स्पर्धक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज समारोसमोर आले आणि त्यांनी एकमेकांना उत्साहाने हस्तांदोलन केलं.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावर सर्वांची नजर लागून होती.
संसदेच्या केंद्रीय सभागृहात दोन्ही सदनांची संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राष्ट्रपतींकडून आयोजित करण्यात आली होती.
अभिभाषण संपल्यानंतर प्रणव मुखर्जी यांना सोडण्यासाठी पुढे आले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींमागे चालत होते, तेव्हा केंद्रीय सभागृहाबाहेर जाणाऱ्या दाराजवळ, गॅलरीत राहुल गांधी रांगेत उभे होते.
नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना पाहिलं, आणि नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना अतिशय उत्साहाने हस्तांदोलन केलं.
निवडणुकीतील आखाड्यानंतर हा एक अदभूत नजारा असल्याचं सांगण्यात आलं. जेव्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी एकमेकांना भेटले, तेव्हा सर्व खासदार त्यांच्याकडे एकटक पाहात होते, त्यांनी एकमेकांना नमस्कारही केला.
अभिभाषणापूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पहिल्या रांगेत, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या बाजूच्या बाकावर बसल्या होत्या. तसेच त्यांच्यात अधूनमधून चर्चाही सुरू होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.