मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये?

मोदींच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवतोय. मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये आलेत का? असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे राहुल गांधीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की, राहुल गांधींच्या भाषणातला आक्रमकपणा वाढलाय... का झाला दोघांच्या वागण्याबोलण्यातला बदल?

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 23, 2014, 10:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींनी आपल्या कॅम्पेनची सुरूवात केली तेव्हाचा त्यांचा अवतार आठवा... जिभेवर अंगार, वागण्या बोलण्यात गर्मी आणि निशाण्यावर राहुल, सोनिया गांधींसह यूपीए सरकार.. मात्र, आता मोदींच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवतोय. मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये आलेत का? असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे राहुल गांधीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की, राहुल गांधींच्या भाषणातला आक्रमकपणा वाढलाय... का झाला दोघांच्या वागण्याबोलण्यातला बदल?
राजकीय टक्के टोमणे नाहीत... सरकारवर शाब्दिक तीरही नाहीत... मोदी बदललेत का? मोदींच्या राजकारणाचा लहेजा बदललाय का? की मोदी आता इलेक्शन मोडमधून गव्हर्नन्स मोडमध्ये आलेत? हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे आपल्या आक्रमक भाषणांनी विरोधकांवर टीकेचा पाऊस पाडणारे मोदी आता थोडे बदलेले दिसत आहेत. वार पलटवारांचा खेळ खेळण्याऐवजी ते आता देशहीताच्या गोष्टी करत आहेत. आपल्या सहकारी नेत्यांच्या चुकीच्या वक्तव्यावर नाराजीही व्यक्त करत आहेत. बदल्या भावना नाही तर १२५ कोटी भारतीयांच्या हिताची चर्चा आता मोदी करायला लागलेत.
 
राजकारणाचे नियम पाळले जातायत. अदानींवरून झालेल्या आरोपांना वाड्राचं नाव घेऊन प्रत्युत्तर दिलं जातंय. तसंच `माँ-बेटे की सरकार` देशाचं नुकसान करत असल्याचा आरोपही होतोय. पण बदलले फक्त मोदी नाहीत.. काँग्रेसच्या युवराजांचा लहेजाही बदललाय. भाषणात तिखटपणा आलाय. मोदींवर केल्या जाणाऱ्या टीकेलाही चांगलीच धार आलीय.
 
विशेष म्हणजे निवडणुका अंतिम टप्प्यात असताना मोदी आणि राहुल यांच्या लहेज्यात आलेल्या बदल दिसू लागलाय. राजकारणातल्या सध्याच्या या दोन दिग्गजांच्या स्टाईलमध्ये आलेला बदल कोणाला फायदेशीर ठरेल? याचं उत्तर अर्थातच १६ मे रोजी मिळणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.