राणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक

कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 3, 2014, 11:55 AM IST

www.24taas.com, झी मिडिया, मुंबई
कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.
काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नीलेश राणेंचा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याच्या भूमिकेवर आमदार दीपक केसरकर ठाम आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी काल केसरकरांची भेट घेऊन त्यांना प्रचार करण्यासंदर्भात सांगितले होते. असे असून केसरकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आता केसरकर कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीत चलबिचल सुरू आहे.
सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना राणे विचारात घेत नसल्याची कुजबूज दबक्या आवाजात सुरु आहे. निवडणुका आल्या की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसतात इतर वेळी साधी दखल घेत नाहीत, अशी परिस्थिती सिंधुदुर्गात असल्याने राष्ट्रवादीतील स्थानिक कार्यकर्ते दुखावले गेले असल्याने ते आक्रमक झालेत, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ