काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना दणका

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूजप्रकरणी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल चांगलाच दणका दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2014, 11:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूजप्रकरणी दाखल केलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल चांगलाच दणका दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या चव्हाण यांच्यासमोर याचिका फेटाळल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10 ए नुसार निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबद्दल उमेदवारी रद्दबातल करण्याचा अधिकार आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
कोणत्याही उमेदवाराचा निवडणूक खर्च तपासण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असा युक्तिवाद चव्हाण यांच्या वकिलांनी केला. तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. येत्या 45 दिवसांत या प्रकरणी निवडणूक आयोगाने रोज सुनावणी घेऊन निकाल द्यावा, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
आदर्श सोसायटी गैरव्यवहारात नाव आल्याने अशोच चव्हाण यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. आता पेड न्यूज प्रकरणात आडकल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपण चुकीचे काही केले नसल्याचे म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.