अभिनेता परेश रावल गुजरातमध्ये सर्वांत श्रीमंत उमेदवार

भारतीय जनता पक्षाचे पूर्व अहमदाबादचे उमेदवार अभिनेते परेश रावल हे गुजरातमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी नुकत्याच भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे पत्नी आणि मुलांची मिळून सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Apr 10, 2014, 04:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
भारतीय जनता पक्षाचे पूर्व अहमदाबादचे उमेदवार अभिनेते परेश रावल हे गुजरातमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी नुकत्याच भरलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे पत्नी आणि मुलांची मिळून सुमारे 80 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.
रावल यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची स्वत:ची संपत्ती 50 कोटी असून, त्यांच्यावर आठ कोटी 12 लाखांचे कर्ज असल्याचं सांगितलंय. आतापर्यंत विविध पक्षांच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार काँग्रेसपेक्षा भाजप आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार कोट्यधीश असल्याचं दिसतंय.
इतर उमेदवारांमध्ये काँग्रेसचे साबरकंठा इथले उमेदवार शंकरसिंह वाघेला हे 22 कोटी सात लाखांच्या संपत्तीचे धनी आहेत. मात्र, त्यांच्याकडे स्वत:चे वाहन नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. पोरबंदर इथून निवडणूक लढविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील एकमेव उमेदवार कंधाल जडेजा यांच्याकडे 28 कोटी दहा लाखांची संपत्ती असल्याचं उघड झालंय.
विशेष म्हणजे, राज्यातील गांधीनगर इथून आम आदमी पक्षातर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आलेले रितुराज मेहता यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 25 कोटी 79 लाख इतकी संपत्ती असल्याचं म्हटलंय. लालकृष्ण अडवानी यांनी त्यांची संपत्ती सात कोटी 59 लाख इतकी असल्याचं नमूद केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.