बाळासाहेबांसाठी सर्वकाही, नादानांसाठी नाही - राज

बाळासाहेब म्हणतात, राज ठाकरेने एक पाऊल पुढे टाकायला हवे, तर मी सांगतो बाळासाहेब तुमच्यासाठी मी १०० पाऊले टाकायला तयार आहे. पण उद्धव आणि त्याच्या चार-पाच नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकायची तयारी नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.

Updated: Feb 13, 2012, 10:23 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

बाळासाहेब म्हणतात, राज ठाकरेने एक पाऊल पुढे टाकायला हवे, तर मी सांगतो बाळासाहेब तुमच्यासाठी मी १०० पाऊले टाकायला तयार आहे. पण उद्धव आणि त्याच्या चार-पाच नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकायची तयारी नाही, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.

 

मुंबई महापालिकेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणुकीची प्रचारसभा आज वरळीतील जांभोरी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना काही खडे प्रश्न विचारले आणि काही खुलासेही केले. यावेळी त्यांनी फक्त शिवसेनेला टार्गेट केले होते.

 

बाळासाहेबांसाठी एक काय शंभर पाऊले टाकणार 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांच्या मुलाखती सर्व वृत्तवाहिन्यांवर होत आहे. त्यातील बाळासाहेबांच्या मुलाखतीचा  संदर्भ घेऊन राज ठाकरे यांनी भाषणात टोलेबाजी केली.  ते म्हणाले, बाळासाहेब म्हटेल की दोन्ही आमचे दरवाजे खुले आहेत. तर मीही म्हणतो माझेही दरवाजे खुले आहेत. तुम्ही सांगितले एक पाऊल टाका, तुमच्यासाठी मी एक काय शंभर पाऊले टाकेल, पण उद्धव आणि त्याच्या नादान टाळक्यांसाठी एक पाऊलही टाकायची माझी तयारी नाही. कशासाठी टाकू एक पाऊल मुंबई महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारासाठी, येथे न होणाऱ्या कामांसाठी असे भेदक  प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थितीत केले.

 

शिवसैनिकांनाही सांगा मर्दाप्रमाणे लढायला

बाळासाहेब म्हणतात, की मर्दाप्रमाणे लढले पाहिजे. पण मी बाळासाहेब शिवसेनेच्या नेत्यांना सांगा, माझी सभा सुरू असताना केबलवरील प्रक्षेपण का काढले जाते. माझी मुलाखत येत असताना त्या वृत्तपत्राचे गठ्ठे का पळविले जातात. केबल काय बंद करतात, पेपर काय चोरता? मी मर्दाप्रमाणे लढतोय. तुम्हीही मर्दाप्रमाणेच लढा, असाही पलटवार राज ठाकरे यांनी बाळासाहेबांवर केला आहे.

 

मी कधी मागितली मुंबई 

मी कधी मागितली होती, मुंबई असा सवाल राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना केला. जेव्हा पक्षाचा प्रचार करायचा त्यावेळेस मी आठवायचो, पण मला अधिकार नव्हते, मला कोणाची नेमणूक करण्याचे स्वातंत्र्य नव्हते, मला फक्त प्रचार करण्यासाठी वापरले जायचे.  जिथे शिवसेनेचा प्रभाव नाही, काँग्रेसचा प्रभाव आहे, अशा दगडाची जबाबदारी माझ्याकडे त्या तिथून पिकवून आणेल, असे मी बाळासाहेबांना सांगितले होते. पण त्या ठिकाणचीही जबाबदारी माझ्यावर दिली नाही, असेही राज ठाकरे बाळासाहेबांनी काढलेल्या विषयावर प्रत्युत्तर दिले.

 

राज ठाकरेच्या बातमीचे काही ठळक मुद्दे

-  राहुल गांधींचा रोड शो पाहिला आहे. असं वाटतं टेम्पो धुतोय.

- रोड शो मला झेपत नाही, मला जमतही नाही

- आज १३ फेब्रुवारी २००८ ला मला पहिली अटक झाली होती.

-  मुंबईकरांची १७ फेब्रुवारीला होणार आहे.

- नकला काय करतोस, मर्दासारखा लढ असं बाळासाहेब म्हटले होते.

- मी मर्दाप्रमाणेच लढतोय.

- केबल काय बंद करताहेत, माझ्याशीही मर्दाप्रमाणे लढा.

- केबल तोडायच्या आणि पेपर चोरायचे हा कुठला मर्दपणा

- सर्व चॅनलवर सर्वांच्या मुलाखती सुरू आहे.

- बाळसाहेबांनी मुलाखत सांगितले होते

- २००१- २००३ मधून राजकारणातून बाजूला झालो होतो.

- २००४ मध्ये बाळासाहेबांनी बोलावून घेतलं होतं. निवडणुका आल्या आहेत. प्रचार करायचा आहे.

- प्रचार करायला मी, पण अधिकार काय?

- नाशिकमधील फक्त कामे बघायचो, अधिकार नव्हते.

- मी कधी मुंबई मागितली होती. जिथे शिवसेनेचा प्रभाव नाही, काँग्रेसचा प्रभाव आहे, अशा दगडाची जबाबदारी माझ्याकडे त्या तिथून पिकवून आणेल.

- शिवसेनेतून बाहेर पडून वेदना झाल्या.

- संबंध बिघडले फक्त फडतूस ४-५ टाळक्यांमुळे

- मनोहर जोशी मला शिवसेनाप्रमुखांकडे घेऊन गेले.

- काल अर्धवट गोष्ट सांगितली. आज मी पूर्ण करतो.

- नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले होते.

- बाळासाहेब, महाराष्ट्रातील जनता का पाठिंबा देत याचा एकदा विचार करा.

-  आमच्या घराचे दरवाजे उघडे आहे. माझे पण आहेत.

- बाळासाहेब तुमच्यासाठी मी शंभर पाऊले टाकेल. पण उद्धव आणि त्यांच्या टाळक्यांसाठी एक पाऊल