निवडणुकीसाठी आली होती हत्यारं?

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १ पिस्तूल, ६ रिव्हॉल्व्हर आणि १२ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी जावेद आलम शब्बीर याला अटक केली आहे.

Updated: Feb 13, 2012, 08:04 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १ पिस्तूल, ६ रिव्हॉल्व्हर आणि १२ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी जावेद आलम शब्बीर याला अटक केली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही हत्यारं मुंबईत आली कशी काय याचा तपास पोलीस करत आहेत.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा ठिक आधी मुंबई स्पेशल ब्रांचने हत्यारांचा मोठा साठा जप्त केला आहे. कुर्ला टर्मिनस स्टेशन बाहेर पोलीसांनी बिहारहून हत्यार घेउन येणाऱ्या जावेद आलम शब्बीर या आरोपीला अटक केली आहे. आरोपी जावेदकडून पोलिसांनी ६ रिव्हॉल्वर, १ पिस्तूल, आणि १२ जिवंत काडतूसं जप्त केली आहेत.

 

हत्यारांचा हा साठा मुंबई निवडणुकांसाठी आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी जावेद हा काही महिन्यांपुर्वी एचडीएफसी बॅंकेत काम करत होता. बारावी पर्यंत शिकलेला जावेदने ही हत्यारं कुणाचा सांगण्यावरून आणली होती? आणि कोणाला देणार होता याचा तपास पोलीस करत आहे.