www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.
आज संध्याकाळी बाद्र्यातल्या एमएमआरडीए मैदानावर बाळासाहेबांची तोफ धडाडणार आहे. तर त्याचवेळी राज ठाकरेंची वरळीतल्या जांबोरी मैदानावर प्रचारसभा होणार आहे. त्यामुळं आज ख-या अर्थानं ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार आहे. बाळासाहेबांची एमएमआरडीए मैदानावर पहिल्यांदाच सभा होत आहे. त्यामुळं या सभेबाबत शिवसैनीकांना मोठी उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडं राज ठाकरे यांना सभेसाठी मैदानच मिळत नव्हते.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी हायकोर्टानं परवानगी नाकारल्यानंतर राज ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानंहा त्यांना शिवाजी पार्कवरील सभेसाठी परवानगी नाकारली. त्यामुळं अखेर राज यांनी वरळीतल्या जांबोरी मैदानाची निवड केलीय. दरम्यान बाळासाहेबांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए मैदनावर तब्बल 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच रॅपिड एक्शन पोर्सच्या तुकड्याही दाखल झाल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
[jwplayer mediaid="46667"]