युतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती

मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.

Updated: Feb 9, 2012, 10:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.

वांद्र्यात आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी पवार बोलत होते. मुंबईच्या सत्तेच्या चाव्या युतीच्या हाता दिल्यानंतर मोठ्याप्रमाणात महापालिकेत भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी लागेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

केंद्राने मुंबईकरांना आणि मुंबईला मोठ्याप्रमाणात मदत केली आहे, परंतु, ही मदत शेवटच्या माणसापर्यंत महापालिकेतील युतीच्या सरकारने पोहचवली नसल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.